Join us

Bajri Market : गेल्या दीड महिन्याच्या तुलनेत बाजरीला मिळाला सर्वाधिक दर; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 10:36 IST

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी, शुक्रवारी या दोन दिवसांत २३० क्विंटल बाजरीची आवक झाली. यामध्ये बाजरीला ३२५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी, शुक्रवारी या दोन दिवसांत २३० क्विंटल बाजरीची आवक झाली. यामध्ये बाजरीला ३२५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

गेल्या दीड महिन्यात बाजरीला मिळालेला हा उच्चांकी दर आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १२ हजार २५९ क्विंटल आवक झाली आहे.

गेल्या वर्षी बाजरीला जानेवारी महिन्यातच ३४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता, तसेच गेल्या १३ महिन्यांत बाजरीला गतवर्षी एप्रिलमध्ये ३५१२ रुपये सर्वाधिक दर मिळाला आहे. गेल्याच वर्षी जानेवारीत बाजरीला २१०० रुपये किमान दर मिळाला होता.

यंदा २०२५ मध्ये हाच दर जानेवारीत किमान २४५० रुपये प्रतिक्विंटल वर पोहचला आहे. त्यामुळे यंदा बाजरीचे दर बाजारात चढेच राहण्याचे संकेत आहेत. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या आकडेवारीनुसार हे दर आणि बाजरीची आवक आहे.

१९६ क्विंटल गावरान ज्वारीची आवकबारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २१८९ गव्हाची गेल्या दोन दिवसांत १२९ क्विंटल आवक झाली, तर या गव्हाला ३३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गावरान ज्वारीची आवक गेल्या दोन दिवसांत १९६ क्विंटल झाली आहे. गावरान ज्वारीला कमाल ३२११ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे, तर बाजरीला ३२५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

३८ क्विंटल हरभऱ्याची आवक३८ क्विंटल गरड्याच्या हरभऱ्याची बाजार समितीत आवक झाली. हरभरा जाडाची आवक २५.२० क्विंटल झाली. हरभरा गरडा किमान ५००० रुपये, जाडा किमान ५५०० रुपये, तसेच गरडा कमाल ५५७१, तर हरभरा जाडा कमाल ६१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

भरडधान्यांचे दर स्थिर १) बाजार समितीमध्ये याशिवाय विविध धान्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामध्ये उडीद, खपली गहू, घेवडा, ज्वारी, तूर, मका, बाजरी, मूग, सूर्यफुल, सोयाबीन, हरभरा आदी भरडधान्यांची आवक झाली. यामध्ये भरडधान्याचे दर स्थिर आहेत.२) बाजार समितीमध्ये गुरुवारी (दि. २ १३) काळा उडिदाची १६.८० क्विंटल आवक झाली. यामध्ये उडदाला प्रतिक्विंटल किमान ४५०० रुपये, कमाल ६३०० रुपये, सरासरी ६३०० रुपये दर मिळाला.३) गुळाची ५९.२० क्विंटल आवक झाली. यामध्ये गुळाला प्रतिक्विंटल किमान ३५२५ रुपये, कमाल ३६५० रुपये, सरासरी ३६०० रुपये दर मिळाला.४) तांबड्या तुरीची १३८ क्विंटल आवक झाली. यामध्ये तुरीला प्रतिक्विंटल किमान ५७०० रुपये, कमाल ६२०० रुपये, सरासरी ६७६१ रुपये दर मिळाला.५) लोकवन गव्हाची ११२.८० क्विंटल आवक झाली. यामध्ये लोकवन गव्हाला प्रतिक्विंटल किमान २३०० रुपये, कमाल ३६५० रुपये, सरासरी ३६०० रुपये दर मिळाला.६) तांबड्या मकेची १७४ क्विंटल आवक झाली. यामध्ये मकेला प्रतिक्विंटल किमान २०५१ रुपये, कमाल २३०० रुपये, सरासरी २२५० रुपये दर मिळाला.

अधिक वाचा: Farmer id : घरबसल्या आता तुमच्या मोबाईलवर काढता येणार फार्मर आयडी; लवकरच होणार हा बदल

टॅग्स :बाजरीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीशेतीज्वारीबारामतीमकाहरभरातूर