Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाकण बाजारात ९ हजार क्विंटल कांद्याची आवक: वाचा नंबर १ कांद्याला काय मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 14:00 IST

kanda bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, कैरी, लसूण आणि हिरव्या मिरचीची विक्रमी आवक झाली.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, कैरी, लसूण आणि हिरव्या मिरचीची विक्रमी आवक झाली.

फळ भाज्यांसह पालेभाज्यांची भरपूर आवक होऊनही भाव कडाडले. एकूण उलाढाल ५ कोटी ९५ लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ९ हजार क्विंटल झाली. कांद्याचे कमाल भाव ५,००० ते १,२०० रुपये मिळाले.

बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. बटाट्याचा कमाल भाव १,३०० रुपयांवर स्थिरावला.

लसणाची व कैरीची एकूण आवक ३५ क्विंटल झाली. त्यांना १० हजार रुपये कमाल भाव मिळाला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक ३७० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभावकांदाएकूण आवक - ९,००० क्विंटल.भाव क्रमांक १) १,२०० रुपये.भाव क्रमांक २) ८०० रुपये.भाव क्रमांक ३) ५०० रुपये.बटाटाएकूण आवक - १,५०० क्विंटल.भाव क्रमांक १) १,३०० रुपये.भाव क्रमांक २) ८०० रुपये.भाव क्रमांक ३) ५०० रुपये.

अधिक वाचा: प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधताय? आता 'असे' मिळणार चार हप्त्यांत अनुदान

English
हिंदी सारांश
Web Title : Chakan Market Sees 9000 Quintals Onion Arrival: Price Details

Web Summary : Chakan market witnessed a huge arrival of onion, potato, and green chilli. Onion fetched ₹5,000 to ₹1,200 per quintal. Total turnover reached ₹5.95 crore.
टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचाकणबटाटाशेतकरीखेडमिरची