Join us

नगरला सुरू होणार लाल कांदा खरेदी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2023 13:11 IST

नाशिक, संभाजीनगर आणि पुणे येथे कांदा उत्पादकांना मिळत असलेला बाजारभाव अहमदनगर जिल्ह्यालाही मिळावा, तसेच अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याचे आदेश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिल्याची माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.

लोखंडे यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री पीयूष गोयल यांची लोकसभा परिसरातील त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषी विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग उपस्थित होते. लोखडे यांनी गोयल यांच्याकडे कांदा खरेदी भावाच्या संदर्भात तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले व याबाबत सविस्तर चर्चा केली.

नाशिक, संभाजीनगर व पुणे जिल्ह्यात सध्या २४.०३ रुपये प्रतिकिलो कांद्याचा खरेदी भाव आहे. मात्र, अहमदनगर (शिर्डी) येथे याच काद्याचे दर २०.७५ रुपये प्रतिकिलो आहेत. हे तीन रुपयांचे नुकसान भरून काढण्याकरिता केंद्रीय कृषी सचिवांमार्फत आदेश द्यावेत व जिल्ह्यातही २४.०३ रुपये किलोप्रमाणे कांदा खरेदी करण्याबाबतची विनंती केली.

टॅग्स :कांदामार्केट यार्डबाजारपुणेनाशिकशेतकरीपीयुष गोयलकेंद्र सरकार