Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > बाजारात आंब्याचा महापूर; विक्रमी आवक सव्वा लाख पेट्या दाखल

बाजारात आंब्याचा महापूर; विक्रमी आवक सव्वा लाख पेट्या दाखल

A flood of mangoes in the market; A record inflow of 1.25 lakh boxes was filed | बाजारात आंब्याचा महापूर; विक्रमी आवक सव्वा लाख पेट्या दाखल

बाजारात आंब्याचा महापूर; विक्रमी आवक सव्वा लाख पेट्या दाखल

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. एकाच दिवशी १ लाख २८ हजार पेट्या आंबा विक्रीसाठी मार्केटमध्ये दाखल झाला. यामध्ये कोकणातील हापूसच्या ८५ हजार ५६० पेट्यांचा समावेश आहे.

बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, कर्नाटक, तामिळनाडूसह केरळमधून आंबा विक्रीसाठी येत आहे. या हंगामातील सर्वाधिक आवकेची नोंद सोमवारी झाली असून, फेब्रुवारीपासून पहिल्यांदाच एक लाख पेट्यांचा टप्पा ओलांडला आहे.

मध्यरात्रीपासून ते सायंकाळपर्यंत कोकणातून ८५,५६० व इतर राज्यांतून ४२,८५० अशा एकूण १ लाख २८ हजार ४१० पेट्यांची आवक झाली. आवक वाढल्यामुळे बाजारभावही कमी झाले आहेत.

कोकणच्या हापूसला बाजार समितीमध्ये २०० ते ८०० रुपये डझन भाव मिळत आहे. किरकोळ मार्केटमध्ये हापूस ४०० ते १२०० रुपये डझन दराने विकला जात आहे. कर्नाटकमधील हापूससदृश आंबा ७० ते १३० रुपये किलो, बदामी ४० ते ६०, तोतापुरी २५ ते ३०, लालबाग ३० ते ६०, गोळा ३५ ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे.

दर नियंत्रणात
महिन्याच्या अखेरपर्यंत आंब्याची मोठ्या प्रमाणात होण्याची आवक शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. यंदा खाण्यासाठी जूनअखेरपर्यंत आंबा उपलब्ध होणार आहे. आंब्याचे दरही नियंत्रणात असल्यामुळे आंबा खरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे मतही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

Web Title: A flood of mangoes in the market; A record inflow of 1.25 lakh boxes was filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.