Join us

सोलापूर बाजार समितीत बेदाणा लिलावासाठी झाला शेतकऱ्यांच्या फायद्याचा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:24 IST

Bedana Market Solapur सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेला बेदाणा सॅम्पल बॉक्समधून ५०० ग्रॅमपेक्षा अधिक कडता घेता येणार नाही, असा निर्णय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी घेतला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेला बेदाणा सॅम्पल बॉक्समधून ५०० ग्रॅमपेक्षा अधिक कडता घेता येणार नाही, असा निर्णय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी घेतला आहे.

दिलीप माने यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाचा पदभार नुकताच स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालासंदर्भात पहिला महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

बाजार समितीमध्ये विक्रीसाठी शेतकरी बेदाणा आणतात. बेदाण्याच्या बॉक्समधून ५०० ग्रॅमपेक्षा अधिक बेदाणा कडता म्हणून घेता येणार नाही.

व्यापाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनीही अशा पद्धतीने जादा बेदाणा घेत असतील, तर त्याला विरोध करावा, असे परिपत्रक बाजार समितीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

या निर्णयामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची दर आठवड्याला ४.५० लाख रुपयांची बचत होणार आहे.

महिन्याला त्यामुळे किमान २० लाख रुपयांची शेतकऱ्यांची बचत होऊ शकते. गेल्या काही वर्षांत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी बेदाण्याची आवक वाढली आहे.

परिणामी, मोठे व्यापारी बेदाण्याच्या खरेदीसाठी सोलापुरात येत असल्याने येथील बेदाण्याला सर्वाधिक भाव मिळत असल्याचे चित्र दिसून येते. 

बेदाण्याची निर्मिती केली जाते. यापूर्वी सांगली आणि तासगावला शेतकरी बेदाणा विक्रीसाठी घेऊन जात होते. सोलापूर मार्केट कमिटी बेदाणा मार्केट सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचला आणि त्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. - दिलीप माने, सभापती, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

अधिक वाचा: Bedana Market : बेदाणा उत्पादक शेतकरी यंदा होणार मालामाल; दरात झाली दुपटीने वाढ

टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीसांगली