Lokmat Agro >बाजारहाट > गणेशोत्सवाला नवी मुंबईत बाजार समितीत ६२५ टन फळ आवक; 'ह्या' फळाला सर्वाधिक पसंती

गणेशोत्सवाला नवी मुंबईत बाजार समितीत ६२५ टन फळ आवक; 'ह्या' फळाला सर्वाधिक पसंती

625 tons of fruit arrived at the market committee in Navi Mumbai for Ganeshotsav; 'This' fruit is the most popular | गणेशोत्सवाला नवी मुंबईत बाजार समितीत ६२५ टन फळ आवक; 'ह्या' फळाला सर्वाधिक पसंती

गणेशोत्सवाला नवी मुंबईत बाजार समितीत ६२५ टन फळ आवक; 'ह्या' फळाला सर्वाधिक पसंती

Fruit Market Vashi गणेशोत्सवानिमित्त मुंबई बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये सोमवारी १६८ टन सफरचंद व ४५७ टन मोसंबी अशी एकूण ६२५ टन आवक झाली आहे.

Fruit Market Vashi गणेशोत्सवानिमित्त मुंबई बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये सोमवारी १६८ टन सफरचंद व ४५७ टन मोसंबी अशी एकूण ६२५ टन आवक झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नवी मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबईबाजार समितीच्या फळमार्केटमध्ये सोमवारी १६८ टन सफरचंद व ४५७ टन मोसंबी अशी एकूण ६२५ टन आवक झाली आहे.

सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात साथीच्या आजार डोके वर काढत आहेत. त्यामुळे पपईसह लिंबूवर्गीय फळांनाही ग्राहकांकडून मागणी वाढू लागली आहे.

पावसाळ्यामध्ये फळांचे उत्पादन कमी होत असले तरी आयात फळांसह देशाच्या विविध विभागांत उपलब्ध होणारी फळे मुंबई बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत असतात.

डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांमुळे डॉक्टरही फळे खाण्याची विशेषः लिंबूवर्गीय फळे खाण्याचा सल्ला देत आहेत. यामुळे पावसामध्येही फळांना चांगली मागणी निर्माण झाली आहे.

बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक सफरचंदची होत आहे. गत आठवड्यात सरासरी ३०० ते ३५० टन आवक होत होती.

ड्रॅगन'ला मोठ्या प्रमाणात मागणी
◼️ सोमवारी सर्वात जास्त ४५७ टन आवक मोसंबीची झाली. आंध्रप्रदेशमधून ती सुरू आहे.
◼️ बाजार समितीमध्ये २५ ते ५० रुपये किलो व किरकोळ मार्केटमध्ये ५० ते १०० रुपये किलो दराने मोसंबीची विक्री होत आहे.
◼️ किवी, ड्रॅगन फ्रुटसोबत पपईची मागणीही वाढली आहे. सरासरी ३० ते ५० टन पपईची विक्री होत आहे.
◼️ गणेशोत्सवामुळे या आठवड्यात फळांची आवक मोठ्या प्रमाणात होईल.

अधिक वाचा: दुर्वाबरोबरच गणपतीला आवडणारे 'हे' फुल होतंय दुर्मिळ; किलोला मिळतोय १००० रुपये भाव

Web Title: 625 tons of fruit arrived at the market committee in Navi Mumbai for Ganeshotsav; 'This' fruit is the most popular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.