सोलापूर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ३७५ ट्रक कांद्याची आवक झाली. किमान १०००, कमाल २०००, तर सर्वसाधारण ८०० रुपये भाव मिळाला.
मंगळवारी ७५ हजार १०८ पिशव्यांत ३७ हजार ५५४ क्विंटल कांद्यातून तीन कोटी ४३ हजार २०० रुपयांची उलाढाल झाली. मागील काही दिवसांत वाढलेली आवक किंचित कमी झाली आहे.
त्यामुळे भावातही घसरण झाली आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, विजयपूर, आदी भागातून कांद्याची आवक होत आहे. अचानक गाड्या वाढत असल्याने समितीत बाजार वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे.
रात्रभर गाड्या बाजार समितीत येत आहेत. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.
नेप्ती बाजार समितीत ५८७ ट्रक कांद्याची आवक
अहिल्यानगर येथील नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी झालेल्या लिलावात लाल कांद्याला ११०० ते १३५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
लिलावासाठी एकूण १ लाख १७ हजार ४७० (६४ हजार ६०८ क्विंटल) गोण्या कांद्याची आवक झाली. लिलावासाठी एकूण ५८७ ट्रक कांद्याची आवक झाली.
कसा मिळाला भाव?◼️ प्रथम प्रतीच्या कांद्याला १,१०० ते १३,५०◼️ द्वितीय प्रतीच्या कांद्याला ८०० ते १,१००◼️ तृतीय प्रतीच्या कांद्याला ४५० ते ८००◼️ चतुर्थ प्रतीच्या कांद्याला २०० ते ४५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
अधिक वाचा: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार का? वाचा सविस्तर
Web Summary : Solapur saw 375 onion trucks arrive, with rates up to ₹2000. Nepti had 587 trucks; top rate ₹1350. Increased arrivals slightly lowered Solapur's prices. Transportation issues persist.
Web Summary : सोलापुर में 375 प्याज के ट्रक आए, दरें ₹2000 तक रहीं। नेप्ती में 587 ट्रक थे; शीर्ष दर ₹1350 थी। आवक बढ़ने से सोलापुर की कीमतें थोड़ी कम हुईं। परिवहन मुद्दे बने हुए हैं।