रब्बी हंगामात गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत ३ लाख ८५ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. तर शासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट १६ लाख ५४ हजार ४५७ क्विंटल तर मका खरेदीचे उद्दिष्ट १ लाख ६० हजार क्विंटल केल्याने जिल्ह्यातील दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात ७६ हजार हेक्टरवर धानाची तर ७हजार हेक्टरवर मका लागवड करण्यात आली होती. धान व मका उत्पादकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते.
रब्बीत ११२ केंद्रावरून धान तर १७ केंद्रावरून हमीभावाने मका खरेदी सुरु आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. १५ मे ही नोंदणी करण्याची अंतिम मुदत होती. या कालावधीत ६४ हजार ५०० धान उत्पादक तर ३४७२ मका उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली.
११२ धान खरेदी केंद्रावरून आतापर्यंत ७९१६ शेतकऱ्यांनी ३ लाख ८५ हजार ८४८ क्विंटल धानाची विक्री केली आहे. खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत ९१ कोटी ४० लाख ७४ हजार रुपये आहे. मका विक्रीसाठी नोंदणी केलेल्या ३४७२ शेतकऱ्यांपैकी २३२ शेतकऱ्यांनी २४४७ क्विंटल मका विक्री केला आहे.
९२ कोटी रुपयांचे चुकारे थकले
जिल्ह्यात हमीभावाने मका आणि धान खरेदीला १ मे पासून सुरुवात झाली आहे. या कालावधीत जवळपास ८ हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली असून त्यांचे ९२ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. विशेष म्हणजे धान खरेदीचे उद्दिष्ट शासनाने वाढवून दिल्याने जिल्ह्यातील हजारो धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Web Summary : Gondia district procured 3.85 lakh quintals of paddy this Rabi season. Farmers registered for paddy and maize sales. Despite procurement, ₹92 crore in payments are pending to approximately 8,000 farmers. Increased procurement targets offer relief.
Web Summary : गोंदिया जिले ने इस रबी सीजन में 3.85 लाख क्विंटल धान खरीदा। किसानों ने धान और मक्का की बिक्री के लिए पंजीकरण कराया। खरीद के बावजूद, लगभग 8,000 किसानों को ₹92 करोड़ का भुगतान लंबित है। बढ़े हुए खरीद लक्ष्य से राहत मिली है।