धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील बोराडी ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात लोकसहभाग श्रमदान चळवळीच्या माध्यमातून दिवाळीकरिता बाहेरगावाहून आलेल्या तरुणांनी बोराडी गावालगत असलेल्या लेंढऱ्या नाल्यावर टाकाऊ सिमेंटच्या गोण्या व त्यात वाळू भरून गोणी एकमेकांवर थर ठेवून वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली.
या वर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झालेला आहे. नाले दुथडी भरून वाहत आहेत. तोंडावर रब्बी हंगाम येत आहे. या अनुषंगाने नाल्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना व त्यांच्या कूपनलिका विहिरी बोअरवेल व बोराडी परिसरालगत असलेल्या जलस्रोतांना याचा उपयोग होईल. पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढेल व बारमाही पीक घेता येऊ शकते, असा उद्देश समोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
अभियानास धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी पिंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंथे, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, विस्तार अधिकारी संजय पवार, सरपंच सुकदेव भिल, उपसरपंच राहुल रंधे, ग्रामपंचायत सदस्या विद्या रंधे, ऊर्मिला पावरा, नीता पावरा, सोनाली सत्तेसा, चांदारीबाई पावरा, आरती भिल, अनिता बडगुजर, मयुरी पवार, शारदा भिल, अनिल पावरा, चंद्रसिंग पवार, बबन पाटील, हारसिंग पावरा, भीमसिंग कुवर, नीलेश महाजन, सतीश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंथे, जितेंद्र गोसावी, राजू पाटील, किशोर वाडीले, शरद पाटील, बापू हटकर, भागवत पवार, बबन पाटील, सतीश पवार, संजय पवार, गणेश बुवा, दिनेश बुवा, विजय गोपाळ, भूषण कुलकर्णी, चंद्रकांत बडगुजर, समाधान पाटील, शरद पवार, सोनू बडगुजर, सना पावरा, अभय पावरा आदींनी श्रमदान केले.
