जिल्हा परिषद सेस सन २०२५-२०२६ अंतर्गत जिल्हा परिषद, सातारा कृषि विभागामार्फत विविध शेती उपयोगी औजारांसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर जावून अर्ज करावयाचा आहे. यामध्ये विविध बाबींसाठी ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्विकारण्यात येणार आहे ते खालीलप्रमाणे आहे.
योजनेतील घटक१) कृषि यांत्रिकीकरण: पेरणीयंत्र, पाचटकुट्टी, खोडवा कटर, पल्टी नांगर.२) पॉवर विडर.३) दोन एचपी विद्युतचलीत कडबाकुट्टी यंत्र.४) कॅन्व्हास/एचडीपीई ताडपत्री.५) ट्रिपल पिस्टन स्प्रेअर्स इंजिन किंवा मोटारीसह.६) ५/७.५ एचपी विद्युत पंपसंच.७) ३ एचपी विद्युत पंपसंच.८) एचडीपीई पाईप (63 mm, 75 mm, 90 mm) किंवा पीव्हीसी पाईप (75 mm, 90 mm)९) मधपेटी.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे१) सातबारा व खाते उतारा (३ महिन्याच्या आतील)२) आधारकार्ड (सत्यप्रत स्वतः साक्षांकित केलेली)३) रेशनकार्ड (सत्यप्रत स्वतः साक्षांकित केलेली)४) बँक पासबूक (राष्ट्रीयकृत बँक अगर जिल्हा मध्यवर्ती बँक सत्यप्रत स्वतः सांक्षाकित केलेली)५) छोटे कुटुंब प्रमाणपत्र.६) कडबाकुट्टी-पशूधन विकास अधिकारी यांचा जनावरे असलेबाबत दाखला व घरगुती विद्युत बिल.७) पाईप व विद्युत पंपसंचासाठी ७/१२ वर विहीर नोंद नसेल तर पाणी परवाना जोडण्यास हरकत नाही व विद्युत बिल.८) कृषि यांत्रिकीकरण, औजारासाठी ट्रॅक्टरचे आरसी बुक सत्यप्रत स्वतः सांक्षाकित केलेली.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईटhttps://www.zpsatarascheme.com
ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी मार्गदर्शक सूचना
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत१५ जुन २०२५
तरी सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी आपणास आवश्यक बाबीसाठी विहीत मुदतीत व सर्व कागदपत्रे जोडून ऑनलाईन अर्ज सादर करावेत. व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा परिषद साताराचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांनी केले आहे.
अधिक वाचा: यंदाच्या खरीपात सोयाबीनच्या अधिक उत्पादनासाठी टॉप १० जाती कोणत्या? जाणून घ्या सविस्तर