Join us

गुणकारी बेल फळाचे आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही देखील व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 20:19 IST

Healthy Bell Fruits : बेल फळ हे अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी परिपूर्ण फळ आहे. विविध शारीरिक व्याधींवर गुणकारी असलेल्या बेल फळाचे जाणून घेऊया आरोग्यदायी फायदे.

बेल फळ हे अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी परिपूर्ण फळ आहे. विविध शारीरिक व्याधींवर गुणकारी असलेल्या बेल फळाचे जाणून घेऊया आरोग्यदायी फायदे.

बेल झाडाची साल आणि फांद्यांमध्ये असलेला फेरोनिया गम हा घटक मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. हे रक्तप्रवाहात इन्सुलिनचे उत्पादन नियंत्रित करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी राखली जाते. बेलाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने, मधुमेह असलेल्या व्यक्तीसाठी तो सुरक्षित आहे.

बेल फळ पाचक समस्यांसाठी देखील फायदेशीर आहे. पोटात अल्सर असलेल्या लोकांसाठी हे उपयुक्त ठरते. त्याच्या रेचक गुणधर्मांमुळे आतड्यांची स्वच्छता होऊन बद्धकोष्ठता टाळली जाते. चिमूटभर मीठ आणि मिरपुडीसह बेल रसाचे सेवन बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यात मदत करते.

बेल फळामध्ये जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असलेले आहे ज्यामुळे अनेक जुनाट आजाराचे निवारण होते. तसेच यामुळे शरीरातील हाडे आणि स्नायू मजबूत होतात. तसेच त्वचेच्या विकारांवर देखील बेल प्रभावी आहे.

बेल फळ रक्त शुद्ध करण्यास मदत करते, तसेच रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करते. यामुळे हृदय, यकृत आणि मूत्रपिंडांच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. सामान्य सर्दी, खोकला आणि फ्लूवरील लक्षणांवर देखील बेल फायदेशीर आहे. हे शरीराला श्लेष्मापासून मुक्त होण्यास मदत करते आणि दम्यावरील उपचार करण्यासाठीही उपयोगी आहे.

बेलाचे सेवन केसांना मजबूत करते. तणावामुळे होणारे केस गळणे आणि तुटणे कमी करते. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी बेल फळ अत्यंत फायदेशीर आहे, कारण ते आईच्या दुधाची गुणवत्ता सुधारते आणि लहान मुलांसाठी आरोग्यदायी ठरते.

या सर्व गुणधर्मांमुळे बेल फळ आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि त्याचा नियमित वापर आरोग्यदायी जीवनासाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र बेल फळाचे अतिरिक्त सेवेन शरीरावर विपरीत परिणाम करू शकतात तेव्हा आपल्या वैद्यकीय सल्लागारांशी या संदर्भात चर्चा करूनच बेल फळाचे सेवन करावे. 

हेही वाचा : नारळाच्या नियमित सेवनाने मिळेल उभारी; सदृढ आरोग्याची नारळ आहे गुरुकिल्ली

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीफळेआरोग्यहेल्थ टिप्स