पुणे : शहरातील तीन दुय्यम निबंधक कार्यालयातील 'ई-मोहोर' प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर उर्वरित २४ दुय्यम निबंधक कार्यालयात या प्रकल्पाची आठवडाभरात अंमलबजावणी सुरू होणार आहे.
नागरिकांना दिलेल्या जाणाऱ्या सेवांमध्ये गतिमानता आणण्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत कार्यालयांना तसेच कर्मचाऱ्यांना गुणांकन दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनादेखील तत्पर सेवा मिळण्यास मदत होईल.
तर ज्या कर्मचाऱ्यांचे काम असमाधानकारक आहे, अशांवर त्याची कारणे तपासून योग्य ती कारवाई केल्याची माहिती सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली. असा प्रयोग राज्यात राबविणारे हे पहिलेच कार्यालय ठरले आहे.
शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांमधून नागरिकांना तत्पर सेवा मिळावी आणि कर्मचाऱ्यांनाही शिस्त लागावी, यासाठी हा 'ई मोहोर' उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती हिंगाणे यांनी दिली.
यात कर्मचाऱ्यांच्या कामावर हजर राहण्याच्या वेळेपासून ते दिलेले काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी १०० गुणांची पद्धत लागू केली आहे.
नोंदणी झालेला दस्त विनाविलंब स्कॅन करून, संबंधित पक्षकारास परत देणे, ऑनलाइन पद्धतीने नोंदणीस दाखल पूर्ण करणे, ऑनलाइन पद्धतीने फाइलिंगसाठी दाखल होणाऱ्या 'नोटिस ऑफ इंटिमेशन'चे फाइलिंग त्वरित करणे, आदी कामांचा समावेश या उपक्रमात आहे.
त्याचबरोबरच प्रायोगिक तत्त्वावर नोंदणी झालेल्या दस्तांच्या सेकंड पीडीएफवर 'डिजिटल साइन' करणे याचाही समावेश आहे. 'ई मोहोर' हा प्रकल्प सुरुवातीला ३ दुय्यम निबंधक कार्यालयांत हाती घेतला होता.
तो यशस्वी झाल्यामुळे अन्य २४ कार्यालयांतही येत्या आठवडाभरात अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दर महिन्याच्या तीन तारखेला याचे रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यात येणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील २७ कार्यालयांतील दुय्यम निबंधकापासून ते शिपाई या सर्व पदांसाठी ही पद्धत लागू केली आहे, असेही ते म्हणाले.
होणाऱ्या भाडेकराराची नोंदणी त्वरित पूर्ण करणे, ऑनलाइन पद्धतीने फाइलिंगसाठी दाखल होणाऱ्या 'नोटिस ऑफ इंटिमेशन'चे फाइलिंग त्वरित करणे, आदी कामांचा समावेश या उपक्रमात आहे.
त्याचबरोबरच प्रायोगिक तत्त्वावर नोंदणी झालेल्या दस्तांच्या सेकंड पीडीएफवर 'डिजिटल साइन' करणे याचाही समावेश आहे. 'ई मोहोर' हा प्रकल्प सुरुवातीला ३ दुय्यम निबंधक कार्यालयांत हाती घेतला होता.
तो यशस्वी झाल्यामुळे अन्य २४ कार्यालयांतही येत्या आठवडाभरात अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दर महिन्याच्या तीन तारखेला याचे रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यात येणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील २७ कार्यालयांतील दुय्यम निबंधकापासून ते शिपाई या सर्व पदांसाठी ही पद्धत लागू केली आहे, असेही ते म्हणाले.
अशी असेल गुणांकन पद्धत
◼️ कार्यालयीन वेळेपूर्वी पाच मिनिटे आधी उपस्थित असल्यास ५ गुण, वेळेनंतर ५ मिनिटांत आल्यास ५ गुण वजा, वेळेनंतर ५ पेक्षा जास्त, पण १० मिनिटांपेक्षा जास्त नसल्यास १० गुण वजा, कार्यालयीन वेळेनंतर १० मिनिटांपेक्षा जास्त वेळेनंतर उपस्थित राहिल्यास उशिराच्या प्रत्येक मिनिटांसाठी २ गुण वजा केले जाणार आहेत.
◼️ दस्त नोंदणी झाल्यावर स्कॅनिंग करण्यासाठी नोंदणी झालेले सर्व दस्त त्याच दिवशी स्कॅनिंग पूर्ण केल्यास ३० गुण, कामकाजाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत स्कॅनिंगसाठी दस्त शिल्लक राहिल्यास प्रती दस्त १ गुण वजा, आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी स्कॅनिंगसाठी शिल्लक राहिलेल्या प्रत्येक दस्तास ३ गुण वजा, किमान २० दस्त नोंदणीच्याच दिवशी अनुक्रमांकानुसार स्कॅन केल्यास मात्र जादा ३० गुण दिले जाणार आहेत.
अधिक वाचा: शेतरस्ते होणार आता कायमचे अतिक्रमणमुक्त; प्रत्येक रस्त्यासाठी मिळणार विशिष्ट नंबर