Lokmat Agro >शेतशिवार > पिकांचे नुकसान झालेल्या याद्या 'ई पंचनामा' पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरु; लवकरच पैसे खात्यावर

पिकांचे नुकसान झालेल्या याद्या 'ई पंचनामा' पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरु; लवकरच पैसे खात्यावर

Work has begun to upload lists of crop damage on the 'e Panchnama' portal; money will be credited to the account soon | पिकांचे नुकसान झालेल्या याद्या 'ई पंचनामा' पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरु; लवकरच पैसे खात्यावर

पिकांचे नुकसान झालेल्या याद्या 'ई पंचनामा' पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरु; लवकरच पैसे खात्यावर

avkali pik nuksan bharpai एप्रिल आणि मे २०२५ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने या आपत्तीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

avkali pik nuksan bharpai एप्रिल आणि मे २०२५ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने या आपत्तीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

एप्रिल आणि मे २०२५ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने या आपत्तीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

महसूल व वनविभागाच्या निर्णयानुसार १८ कोटी ९२ लाख ६५ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, ही रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केली जाणार आहे.

जिल्ह्यातील २३ हजार ४४५ शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. अवकाळी पावसामुळे एकूण १० हजार ६४७.९६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.

जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर केलेल्या अहवालानुसार, एप्रिलमध्ये ४,१२६.७९ हेक्टर क्षेत्रातील ७,२६८ शेतकरी बाधित झाले असून, त्यासाठी ७ कोटी १८ लाख ४६ हजार रुपये मंजूर केले आहेत.

तर मे महिन्यात ६,५२१.१७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याने १६,१७७ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या स्वरूपात ११ कोटी ७४ लाख १९ हजार रुपये मिळणार आहेत.

कधी मिळणार मदत?
शासनाकडून मदत मंजूर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या 'ई पंचनामा' पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू केले आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर 'अपलोड' झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत 'डीबीटी'द्वारे मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे

'डीबीटी'द्वारे मदतनिधी थेट खात्यात वर्ग होणार
एप्रिलमध्ये ४,१२६.७९ हेक्टर क्षेत्रातील ७,२६८ शेतकरी प्रभावित झाले, ज्यासाठी ७ कोटी १८ लाख ४६ हजार रुपये, तर मे महिन्यात ६,५२१.१७ हेक्टर नुकसान झाले असून, १६,१७७ शेतकऱ्यांना ११ कोटी ७४ लाख १९ हजार रुपये वितरित केले जातील. डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाईच्या वाटपात गैरप्रकार होणार नाहीत व संपूर्ण पारदर्शकता राखली जाणार आहे.

शेतकरी आर्थिक संकटात
मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात तडाखा दिल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याचा खरिपाच्या नियोजनावर परिणाम झाला. त्यानंतर खरीप हंगामातही नैसर्गिक आपत्तीने वारंवार पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात फसले असून, शासनाकडून लवकरात लवकर मदत तातडीने मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

अधिक वाचा: ३५ गुंठ्यांत 'या' शेतकऱ्याने घेतली तब्बल २६ प्रकारची पिकं; सहा महिन्यात पावणेचार लाखांचे उत्पन्न

Web Title: Work has begun to upload lists of crop damage on the 'e Panchnama' portal; money will be credited to the account soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.