कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सरकारकडून उमेद योजना राबविण्यात येते. राज्यात लाखो महिलांना लखपती दीदी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
काय आहे उमेद अभियान?◼️ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेदच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी लखपती दीदी योजना राबवली जात आहे.◼️ याद्वारे स्वयंसाहाय्यता समूहातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी मदत करून वार्षिक १ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील लाखांहून अधिक महिलांचा जीवनस्तर सुधारत आहे.
लखपती दीदी योजना म्हणजे काय?◼️ ग्रामीण भागातील महिलांना उद्योजक बनवणे आणि वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या वर नेणे.◼️ उमेद अभियानांतर्गत महिलांना लघु उद्योगांसाठी (उदा. सॅनिटरी नॅपकिन, साडी सेंटर) प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि वित्तीय मदत दिली जाते.
लखपती दीदींचे उद्दिष्ट?◼️ राज्यात २५ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट आहे.
या व्यवसाय-उद्योगांचा समावेश◼️ उमेद बचत गटांनी ग्रामीण स्तरावर विविध व्यवसाय उभे केले आहेत.◼️ कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, पशुखाद्य उत्पादन, डाळ मिल, डाळबट्टी/आटा प्रक्रिया, तेलघाणी, मसाले पापड, लोणची तयार करणे, सौरऊर्जेवर कांदा वाळवणी, शिलाई मशीन व विणकाम, ब्युटीपार्लर, ज्यूट बॅगनिर्मिती या उत्पादनांपैकी २२ प्रमुख उत्पादने 'उमेद मार्ट' वर ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
योजनेचा लाभ कसा घ्यायचा?◼️ सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या गावातील किंवा परिसरातील महिला स्वयंसाहाय्यता गटाचे सदस्य व्हावे लागेल, या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला विविध कौशल्ये (उदा. प्लंबिंग, ड्रोन दुरुस्ती, एलईडी बल्ब निर्मिती) शिकवते.◼️ प्रशिक्षणानंतर तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे, याचा एक आराखडा तयार करा, तुमची योजना ग्रामपंचायत किंवा स्थानिक बचत गट कार्यालयात सादर करा.◼️ या योजनेसाठी फक्त महिला अर्ज करू शकतात आणि त्या बचत गटाशी जोडलेल्या असाव्यात.
बचत गट किती, लखपती दीदी किती?◼️ महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत या योजनेमुळे स्वतःचे छोटे व्यवसाय यशस्वीपणे उभे केले आहेत.◼️ वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयापेक्षा अधिक असल्याचे निश्चित केले आहे.◼️ त्यामुळे ही कुटुंबे 'लखपती दीदी' श्रेणीत समाविष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.
अधिक वाचा: नमो शेतकरीचा आठवा हप्ता 'या' आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता
Web Summary : Umed scheme empowers rural women in Maharashtra, aiming to make them 'Lakhpati Didis' by providing skills training and financial assistance for businesses like poultry, dairy, and small-scale industries, targeting an annual income exceeding ₹1 lakh.
Web Summary : उमेद योजना महाराष्ट्र की ग्रामीण महिलाओं को सशक्त बनाती है, जिसका लक्ष्य उन्हें कौशल प्रशिक्षण और कुक्कुट पालन, डेयरी और लघु उद्योगों जैसे व्यवसायों के लिए वित्तीय सहायता प्रदान करके 'लखपति दीदी' बनाना है, जिसका वार्षिक आय ₹1 लाख से अधिक है।