पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यात मक्याचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे तेथील लाभार्थ्यांना रेशन दुकानातून गव्हासोबत तांदळाऐवजी मका देण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रेशनवर तांदूळ मिळणार की नाही, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता; मात्र जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच गहू व तांदूळ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे.
घरात थप्पी; रेशनच्या मक्याचे करायचे काय?◼️ राज्यात काही जिल्ह्यात मका वाटप सुरू झाले आहे. तेथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आधीच मका उभा आहे, तर घरातही मक्याच्या थप्प्या लागल्या आहेत.◼️ अशा परिस्थितीत रेशनवर पुन्हा मकाच मिळणार असल्याने त्याचे करायचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
लाभार्थी म्हणतात 'आम्हाला तांदूळच हवाय'◼️ रेशनवरील तांदूळ हा गरीब कुटुंबांच्या रोजच्या आहाराचा मुख्य भाग आहे.◼️ आम्हाला मका नको, आमचा तांदूळ बंद करू नका, अशी भावना जिल्ह्यातील लाभार्थ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात मका नाही, तांदूळ मिळणार◼️ राज्यातील काही भागात मका वितरणाचे आदेश असले तरी, जिल्ह्यात अद्याप तशा कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.◼️ त्यामुळे जिल्ह्यातील रेशन दुकानांतून लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच गहू आणि तांदळाचे वितरण सुरळीत सुरू राहणार आहे.
कार्डधारकांना धान्य?◼️ प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू ३ किलो तर तांदूळ २ किलो (प्रति सदस्य) असे एकूण ५ किलो धान्य प्रति सदस्य मिळते.◼️ अंत्योदय योजनेत २१ किलो गहू तर १४ किलो तांदूळ प्रत्येक कार्डावर दिले जाते.
अधिक वाचा: सोलापूरमध्ये ३७५ ट्रक तर नेप्ती बाजारात ५८७ ट्रक कांद्याची आवक; कोणत्या बाजारात मिळतोय चांगला दर?
Web Summary : Confusion arose about ration distribution in Pune. While some areas get maize instead of rice, Pune will continue receiving rice and wheat as before. Priority households get 3kg wheat, 2kg rice per member. Antyodaya cards get 21kg wheat, 14kg rice.
Web Summary : पुणे में राशन वितरण को लेकर भ्रम की स्थिति बनी। कुछ क्षेत्रों में चावल की जगह मक्का मिल रहा है, वहीं पुणे में पहले की तरह चावल और गेहूं मिलता रहेगा। प्राथमिकता वाले परिवारों को प्रति सदस्य 3 किलो गेहूं, 2 किलो चावल मिलता है। अंत्योदय कार्ड पर 21 किलो गेहूं, 14 किलो चावल मिलता है।