Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > अतिवृष्टीच्या पॅकेजमधील पिक विम्याचे १७,५०० रुपये सर्वच शेतकऱ्यांना मिळणार का? वाचा सविस्तर

अतिवृष्टीच्या पॅकेजमधील पिक विम्याचे १७,५०० रुपये सर्वच शेतकऱ्यांना मिळणार का? वाचा सविस्तर

Will all farmers get Rs 17,500 in crop insurance from the heavy rainfall package? Read in detail | अतिवृष्टीच्या पॅकेजमधील पिक विम्याचे १७,५०० रुपये सर्वच शेतकऱ्यांना मिळणार का? वाचा सविस्तर

अतिवृष्टीच्या पॅकेजमधील पिक विम्याचे १७,५०० रुपये सर्वच शेतकऱ्यांना मिळणार का? वाचा सविस्तर

ativrushti pik vima madat प्रत्यक्षात पिक विमा मदत महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे. मात्र, महसूल मंडळानुसार हे उत्पादन बदलणारे आहे.

ativrushti pik vima madat प्रत्यक्षात पिक विमा मदत महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे. मात्र, महसूल मंडळानुसार हे उत्पादन बदलणारे आहे.

पुणे : खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यात पीक विमा योजनेतून हेक्टरी साडेसतरा हजार रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते.

प्रत्यक्षात ही मदत महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे. मात्र, महसूल मंडळानुसार हे उत्पादन बदलणारे आहे.

त्यानुसार विमा कंपनी भरपाई देईल. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री नाही.

खरीप हंगामात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर राज्य सरकारने त्यावर ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

त्यातील एक मदत पीक विमा योजनेतून प्रति हेक्टरी साडेसतरा हजार रुपये दिले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते.

मात्र, ही मदत देताना महसूल मंडळनिहाय बारा ठिकाणी घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या उत्पादनाच्या सरासरीवर अवलंबून असणार आहे.

या सरासरीची गेल्या पाच वर्षामधील सरासरी उत्पादनाशी (उंबरठा उत्पादन) तुलना केली जाणार आहे. उंबरठा उत्पादनापेक्षा सरासरी उत्पादन कमी असल्यास संबंधित महसूल मंडळातील शेतकरी नुकसान भरपाईला पात्र असतील.

उदाहरणार्थ सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या दहा टक्के कमी असल्यास विमा संरक्षित रकमेच्या दहा टक्केच भरपाई शेतकऱ्यांना मिळेल.

हे उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या १०० टक्केहून कमी असल्यास अशांना संपूर्ण विमा संरक्षित रक्कम भरपाई म्हणून मिळेल. सोयाबीनसाठी ही विमा संरक्षण रक्कम ५६ हजार रुपयांपर्यंत आहे.

संपूर्ण नुकसानभरपाई मिळण्यासाठी महसूल मंडळातील सरासरी उत्पादन शून्य असणे अपेक्षित आहे.

नुकसानभरपाई मिळेल याबाबत साशंकता
सर्वच महसूल मंडळांमध्ये वेगवेगळी असू शकेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या साडेसतरा हजार प्रति हेक्टरची नुकसानभरपाई सर्वच शेतकऱ्यांना मिळेल याबाबत साशंकता आहे.

अधिक वाचा: Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यांना आता 'राज्य आपत्ती'चा दर्जा; बिबट्याच्या हल्ल्यात जीव गेल्यास कशी मिळणार भरपाई?

Web Title : भारी बारिश पैकेज: क्या सभी किसानों को फसल बीमा मिलेगा?

Web Summary : महाराष्ट्रातील अतिवृष्टी मदत पॅकेजमध्ये हेक्टरी ₹17,500 पीक विम्याचे आश्वासन आहे. भरपाई मंडळातील पीक उत्पादनावर अवलंबून आहे. पूर्ण रक्कम अनिश्चित.

Web Title : Heavy Rain Package: Will all farmers get crop insurance?

Web Summary : Maharashtra's heavy rain relief package promises ₹17,500/hectare crop insurance. Actual compensation depends on revenue circle crop yield averages. Payout varies; full amount uncertain for all farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.