Join us

देशात केळी उत्पादनात कोणते राज्य पुढे? महाराष्ट्रात कोणता जिल्हा पुढे? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 10:30 IST

भारत हा जगातील सर्वाधिक केळी उत्पादक देशांपैकी एक आहे. देशातील ७ राज्ये एकत्रितपणे ८५ टक्के केळीचे पीक घेतात.

भारत हा जगातील सर्वाधिक केळी उत्पादक देशांपैकी एक आहे. देशातील ७ राज्ये एकत्रितपणे ८५ टक्के केळीचे पीक घेतात.

देशात आंध्र प्रदेश हे देशातील सर्वात मोठे केळी उत्पादक राज्य आहे. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातजळगावची केळी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्रातील केळी मोठ्या प्रमाणावर गुजरात, पंजाब आणि उत्तर भारतात निर्यात केली जातात. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख येथे थंड हवेमुळे केळीचे अजिबातच उत्पादन होत नाही.

प्रमुख केळी उत्पादक राज्ये आणि त्यांचा वाटा (%)बिहार : ६.०६उत्तर प्रदेश : १०.४५कर्नाटक : ११.४४तामिळनाडू : १२.००गुजरात : १२.०४महाराष्ट्र : १४.२६आंध प्रदेश : १७.९९

महाराष्ट्राच्या केळी उत्पादनात अर्ध्याहून अधिक वाटा जळगावचामहाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचा केळी उत्पादक राज्य (१४.२६%) असून, राज्यात मुख्यतः उत्तर महाराष्ट्र आणि काही पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर केळीची शेती होते. जळगाव हा 'केळीचा जिल्हा' म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या केळी उत्पादनात अर्ध्याहून अधिक वाटा जळगावचा आहे.

जिल्हा आणि उत्पादनाचा अंदाजित वाटा (%)जळगाव : ५०-५५नाशिक : १०-१२कोल्हापूर : ८-१०सोलापूर : ६-८धुळे : ५-६बीड : ४-५औरंगाबाद : ३-४सांगली, अहमदनगर, परभणी इ. : २-३

स्रोत: नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, भारत सरकार

अधिक वाचा: डाळिंबांच्या या जातींनी महाराष्ट्राच्या फलोत्पादन क्षेत्रात केली क्रांती; वाचा सविस्तर

टॅग्स :केळीशेतीफलोत्पादनफळेमहाराष्ट्रतामिळनाडूआंध्र प्रदेशजळगाव