शासनाने सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना चालू खरीप हंगामापासून लागू केली असून, रब्बी हंगामासाठी ही योजना अधिसूचित मंडळातील अधिसूचित पिकांसाठी उपलब्ध आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी करणे व फार्मर आयडी अनिवार्य राहणार आहे.
कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक स्वरूपाची आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी अर्ज सादर करण्याची ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत तर गहू व हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात ही योजना आयसीआयसीआय लॉबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, पुणे यांचेमार्फत राबविली जाणार आहे. तरी शेतकऱ्यांनी शेवटच्या टप्प्यात गर्दी टाळून वेळेत नजीकच्या बँक किंवा नागरी सुविधा केंद्रामार्फत पीक विमा संरक्षण घ्यावे, असे आवाहन केले आहे.
बोगस विमा काढू नये
लातूर जिल्ह्यात ही योजना आयसीआय लोम्बार्ड, जनरल इन्शुरन्स कंपनी पुणे यांच्यामार्फत राबविली जाणार आहे. कोणत्याही अवैध मार्गाने विमा काढल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. बोगस पीकविमा घेतल्याचे आढळल्यास कारवाई होईल.
हरभऱ्यास जोखीम स्तर
शेवटच्या टप्प्यात गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आत्ताच नजीकच्या बँक किंवा नागरी सुविधा केंद्रामार्फत पीकविमा संरक्षण घ्यावे. हरभरा जोखीम स्तर ७० टक्के विमा संरक्षित रक्कम ३६ हजार प्रति हेक्टर असून, शेतकऱ्यांचा हप्ता ५४० प्रतिहेक्टर आहे.
