एकूण शेती पिकांच्या १५% पिकांमध्ये स्वपरागीकरण घडून येते, येते, त्यात एकाच झाडावरील परागकणांच्या वाहतूकीसाठी गुरुत्वाकर्षण किंवा हवेसारखे घटक कारणीभूत ठरतात तर ८५% शेती पिकांमध्ये परपरागीभवन दिसून येते.
अशावेळी झाडावरील फूल स्वतःमधील परागकणांचा उपयोग करू शकत नाही. फुलांची फलन क्रिया स्वतःच्याच प्रजातीच्या अन्य झाडावरील परागकण मिळवून परागीभवन क्रिया पूर्ण होते.
राणी मधमाशी कशी काम करते?
◼️ मधमाशांच्या वसाहतीत अंडी घालण्याचे काम करणारी प्रजोत्पादन करणारी एकच मादी मधमाशी असते ती म्हणजेच राणी मधमाशी होय.
◼️ वसाहतीतील ती एकटीच फलित झालेली मधमाशी प्रजोत्पादनाचे काम करते.
◼️ पोळ्यातील षटकोनी कप्प्यात अंडी घालण्याचे काम ती आयुष्यभर करते.
◼️ तिची आयुमर्यादा दोन ते तीन वर्षे असते.
◼️ एका कप्प्यात एक याप्रमाणे ती अंडी घालत असते आणि दर दिवशी सरासरी ५०० ते ७०० अंडी घालते.
◼️ अर्थात पोळ्यात अन्नाचा साठा कमी दिसू लागताच अंडी घालण्याचे काम थांबवते.
◼️ राणी मधमाशीचा शोध घेत असताना तिच्या आजूबाजूला नेहमी कामकरी मधमाशांची फौज दिसून येते.
◼️ तिचे उदर फुगीर असते आणि टोकाचा भाग निमुळता असतो.
◼️ अंड्यातून ४ ते १६ दिवसात पूर्ण वाढ झालेली नवीन राणी मधमाशी कप्प्यातून बाहेर पडते.
◼️ पोळ्यातील खालच्या बाजूस खारकेच्या आकाराच्या विशिष्ट कप्प्यात राणीची पैदास होते.
◼️ राणीला व नवजात अळ्यांना रॉयल जेली (राजान्न) कामकरी मधमाशा भरवीत असतात.
◼️ राणी मधमाशीच्या तोंडाजवळील ग्रंथीतून संदेश संप्रेरकांची निर्मिती होत असते.
◼️ या संदेश संप्रेरकांमुळे राणीचे अस्तित्व इतर मधमाशांना कायम जाणवत राहते.
◼️ त्यामुळे कामकरी मधमाशा राणीच्या नियंत्रणाखाली एकत्रित राहतात.
◼️ त्याशिवाय वसाहतीतील सर्व मधमाशांमध्ये सुरक्षिततेची भावनाही निर्माण होते.
◼️ आयुष्यात तिचे आठ ते दहा नरांशी फक्त एकदाच मिलन पेटीबाहेर हवेत होते. त्याला मॅरेज फ्लाईट असे संबोधतात.
अधिक वाचा: दरवर्षी पिक फेरपालट करणे गरजेचे आहे का? याचे शेतीला कसे होतात फायदे? वाचा सविस्तर