Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > सर्वाधिक प्रथिनांचे प्रमाण असणारी पहिली पाच कडधान्ये कोणती? जाणून घ्या सविस्तर

सर्वाधिक प्रथिनांचे प्रमाण असणारी पहिली पाच कडधान्ये कोणती? जाणून घ्या सविस्तर

What are the top five grains with the highest protein content? Find out in detail | सर्वाधिक प्रथिनांचे प्रमाण असणारी पहिली पाच कडधान्ये कोणती? जाणून घ्या सविस्तर

सर्वाधिक प्रथिनांचे प्रमाण असणारी पहिली पाच कडधान्ये कोणती? जाणून घ्या सविस्तर

World Pulses Day 2026 २०१६ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून जाहीर केले. कडधान्यांचे महत्त्व लक्षात घेऊन २०१८ पासून १० फेब्रुवारी हा दिवस अधिकृतपणे जागतिक कडधान्य दिवस म्हणून साजरा होऊ लागला.

World Pulses Day 2026 २०१६ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून जाहीर केले. कडधान्यांचे महत्त्व लक्षात घेऊन २०१८ पासून १० फेब्रुवारी हा दिवस अधिकृतपणे जागतिक कडधान्य दिवस म्हणून साजरा होऊ लागला.

जागतिक कडधान्य दिवस दरवर्षी १० फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्र संघ (UNO) आणि FAO (Food and Agriculture Organization) यांच्या पुढाकाराने साजरा केला जातो.

२०१६ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून जाहीर केले होते. कडधान्यांचे महत्त्व लक्षात घेऊन २०१८ पासून १० फेब्रुवारी हा दिवस अधिकृतपणे जागतिक कडधान्य दिवस म्हणून साजरा होऊ लागला.

कडधान्ये म्हणजे गरीबांची प्रथिने
◼️ २०-२५% प्रथिने.
◼️ फायबर भरपूर-पचन सुधारते.
◼️ लोह, झिंक, मॅग्नेशियम.
◼️ कमी ग्लायसेमिक इंडेक्स-मधुमेहासाठी उपयुक्त.
◼️ हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत.

आरोग्यदृष्ट्या फायदे
◼️ स्नायू व शरीरवाढीस मदत.
◼️ रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल नियंत्रण.
◼️ वजन नियंत्रणात उपयोगी.
◼️ शाकाहारी लोकांसाठी उत्तम प्रथिन स्रोत.

सर्वाधिक प्रथिने देणारी कडधान्ये
१) मसूर

◼️ प्रथिने - २५%
◼️ फायबर - खूप जास्त.
◼️ लोह व फॉलिक ॲसिड - उत्कृष्ट.
◼️ फायदे - रक्तवाढ, हृदयासाठी चांगली, लवकर शिजते.

२) उडीद
◼️ प्रथिने - २५%
◼️ कॅल्शियम व लोह - चांगले प्रमाण.
◼️ फायदे - स्नायू, हाडे मजबूत करतो.
◼️ शक्तिवर्धक कडधान्य.

३) मूग
◼️ प्रथिने - २३-२४%
◼️ पचन - खूप सोपे.
◼️ व्हिटॅमिन B - समृद्ध.
◼️ फायदे - आजारी, लहान मुले व वृद्धांसाठी योग्य.
◼️ हलके पण अत्यंत पौष्टिक.
◼️ सर्वाधिक संतुलित पोषणमूल्य.

४) तूर
◼️ प्रथिने - २२-२४%
◼️ फायबर भरपूर - पचन सुधारते.
◼️ लोह, पोटॅशियम, B-व्हिटॅमिन्स.
◼️ रोजच्या जेवणासाठी योग्य, पोटभरपणा देते.
◼️ चांगल्या दर्जाची वनस्पतीजन्य प्रथिने.

५) हरभरा/चणा
◼️ प्रथिने - १९-२१%
◼️ फायबर - भरपूर.
◼️ खनिजे - लोह, झिंक, मॅग्नेशियम.
◼️ फायदे - वजन नियंत्रण, मधुमेहासाठी उपयुक्त.
◼️ ऊर्जा व पोटभरपणा देणारे.

अधिक वाचा: कुक्कुटपालन, डेअरी व शेळीपालन व्यवसायाच्या वीज बिलात होणार आता बचत; कसा घ्याल फायदा?

Web Title : सर्वाधिक प्रोटीन वाली शीर्ष 5 दालें: एक विस्तृत गाइड

Web Summary : विश्व दाल दिवस 10 फरवरी को मनाया जाता है। दालें प्रोटीन, फाइबर और आवश्यक पोषक तत्वों से भरपूर होती हैं, जो मांसपेशियों के विकास, रक्त शर्करा को नियंत्रित करने और वजन प्रबंधन को बढ़ावा देने में मदद करती हैं। मसूर, उड़द, मूंग, तुअर और चना सूची में सबसे ऊपर हैं।

Web Title : Top 5 Pulses Highest in Protein: A Detailed Guide

Web Summary : World Pulses Day is celebrated on February 10th. Pulses are rich in protein, fiber, and essential nutrients, benefiting health by aiding muscle growth, controlling blood sugar, and promoting weight management. Lentils, black gram, mung beans, pigeon peas and chickpeas top the list.