lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा, मराठवाडा आघाडीवर

राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा, मराठवाडा आघाडीवर

Water supply through 1,858 tankers across the state, with Marathwada in the lead | राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा, मराठवाडा आघाडीवर

राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा, मराठवाडा आघाडीवर

येत्या काळात उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, भीषण टंचाईचे सावट जाणवणार आहे.

येत्या काळात उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, भीषण टंचाईचे सावट जाणवणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

१,४५२ गावे आणि ३,३०१ वाड्यांमध्ये ८२ शासकीय टँकरद्वारे, तर १,७७६ खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कोकणात ७१, खान्देशमध्ये ४०९, पश्चिम महाराष्ट्रात ३९२, मराठवाड्यात ९५३ आणि विदर्भात केवळ ३३ टँकर सुरू आहेत.

एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच राज्यात पाणीटंचाईचे स्वरूप आणखी तीव्र झाले आहे. कोकण, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टैंकर मराठवाड्यात सुरू आहेत. राज्यात एकूण एक हजार ८५८ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून, या पाणीबाणीत टँकर लॉबी मालामाल होत आहे.

सिंधुदुर्ग, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत टँकरची संख्या शून्यावर आहे.

उन्हाळा आणि पाणीटंचाई हे समीकरण झाले आहे. उन्हाळ्यात महिला व पुरुषांना हंडाभर पाण्यासाठी पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाणीटंचाईची समस्या निकाली निघू शकली नाही. त्यामुळे या योजनांवर झालेला खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अनेकदा टँकर लॉबीला मालामाल करण्यासाठी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जाते.

येत्या काळात उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, भीषण टंचाईचे सावट जाणवणार आहे. प्रकल्पातील जलसाठा कमी होत आहे. विहिरी कोरड्या पडत आहेत, तर बोअरवेलच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. ही टंचाई टैंकर लॉबीला मालामाल करणारी ठरत आहे, तन दुसरीकडे टँकरमुक्तीची घोषणाह हवेत विरली आहे

Web Title: Water supply through 1,858 tankers across the state, with Marathwada in the lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.