Join us

Water Conservation: दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा; लोकसहभागातून गावे झाली 'पाणी'दार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 16:40 IST

Water Conservation : दुष्काळी (drought) स्थितीवर मात करण्यासाठी हदगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन यंदाच्या उन्हाळ्यात गावे पाणीदार ('water-rich') कसे राहील, यावर तोडगा काढून गावे टँकरमुक्त केले आहे.

सुनील चौरे

दुष्काळी(drought) स्थितीवर मात करण्यासाठी हदगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन यंदाच्या उन्हाळ्यात गावे पाणीदार ('water-rich') कसे राहील यावर उपाय योजना करून गावे टँकरमुक्त केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील काही गावातील तळाला गेलेले तलाव उन्हाळ्यातही भरलेली दिसत आहेत. त्यामुळे पाणीपातळी उंचावून नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला. ('water-rich')

गेल्या वीस वर्षांपासून सतत पाणीटंचाईचा (drought) सामना करणाऱ्या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असे. टँकरची वाट पाहण्यात रात्र जागून काढावी लागत असायची. भांडणतंटे नेहमीचेच ठरलेले. या दहा गावांकडे पाहण्याचा इतर लोकांचा दृष्टिकोनही वेगळाच होता. ('water-rich')

लेकीबाळी गावात देण्यास टाळाटाळ केली जायची; परंतु या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आले. लोकसहभागातून या गावांनी पाणीटंचाईवर मात केली असून आता ही गावे टँकरमुक्त झाली आहेत. ('water-rich')

एकेकाळी १९९० पर्यंत पाणीच पाणी असलेली मनाठा, सावरगाव, चिंचगव्हाण, निवघा, तामसा, कनकेवाडी, निवळा, वडगाव, एकराळा, बरडशेवाळा, कवाना, पळसा, डोंगरगाव, उंचाडा, पिंपरखेड, नेवरी या गावांना पाणीटंचाईच्या संकटाने ताब्यात घेतले. ('water-rich')

पाण्यासाठी भांडणे, मारामाऱ्या व्हायच्या, पण आता गावात लोक राहताहेत समाधानी

* गावातील पाणीपातळी खालावत गेली. लोकसंख्या वाढली पाणीवापरही वाढला; पण सार्वजनिक विहरी, आड जानेवारी, फेब्रुवारीमध्येच आटू लागले.

* खासगी विहिरींचे आधिग्रहण करणे, बोअर मारणे सुरू झाले; पण एवढ्यावर ही समस्या थांबली नाही. तर तिने ऊग्ररूप धारण केले. त्यामुळे घोटभर पाणीसुद्धा मिळत नव्हते.

* पाण्यासाठी भांडणे, पाणीचोरी अशा घटना घडू लागल्या. टँकर भरण्यासाठी ज्या गावातील बोअर अधिग्रहण केले तेथील विजेचा प्रश्न निर्माण झाला की, टँकर येत नव्हते.

प्रशासनाने तलावातील गाळ उपसा केला

* गावकऱ्यांनी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढला. तसेच तहसील कार्यालयावरही मोर्चा नेला. तेव्हा यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी प्रयत्न केला.

* ज्या गावातील तलाव गाळाने माखलेले होते त्या तलावातील गाळ उपसा करण्याचा ठराव घेतला.

* लोकसहभागातून शेतकऱ्यांनी हा गाळ आपल्या शेतात नेला व जमीन सुपीक केली. मनाठा, सावरगाव, चिंचगव्हाण, पळसा, डोंगरगाव, उंचाडा, बरडशेवाळा निवधा, तळणी, तामसा आदी गावांतील तलाव गाळाने भरून गेलेले होते.

* त्यामुळे पाऊस भरपूर पडला तरी पाणी साठवण होत नसे. पाणी वाहून जाई व दुष्काळ सुरू राहत असे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून या दहाही गावांत पाणीटंचाई निर्माण झालीच नाही. या गावाचा आदर्श घेऊन इतर १० ते १५ गावांतील गाळ उपसा करण्यात आला. हे काम अद्यापही सुरूच आहे.

* हदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शेतालगत असलेल्या तळ्यातही असे पाणी भरुन राहत आहे.

हे ही वाचा सविस्तर : kapus kharedi : बदनापूरचे हमीभाव कापूस खरेदी केंद्र आघाडीवर जाणून घ्या काय आहे कारण

टॅग्स :शेती क्षेत्रपाणीदुष्काळमराठवाडापाणीकपातनांदेड