रमेश कदम
आखाडा बाळापूर : विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी इथल्या मातीत रुजलेले संस्कृतीचे मूळ स्त्रोत अजूनही इथल्या माणसाला सर्वांत जवळचे, आपलेसे वाटतात. (Viral Vihir Story)
कितीही मिनरल वॉटर आले तरी विहिरीतले (Vihir) गोड पाणी आजही सामान्य माणसाला तृप्त करते. त्यामुळे विहिरीचा वापर, उपयोग आणि आवड अद्यापही कायम आहे.
बाळापूरच्या एका शेतकऱ्याने ही आवड जपतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परंपरा आणि छंद जोपासत शेतातील विहिरीला (Vihir) नवीन तंत्रज्ञानाची जोड देत तिचा वापर सहजसोप्पा केलाय.
पूर्वी विहिरीतील पाणी रहाटाने शेंदणे मोठी कसरत होती; पण तंत्रज्ञानाचा वापर करत रहाटाला बेअरिंग बसवून केवळ बोटाच्या वापराने ताकद न लावता खोल विहिरीतले पाणी शेंदले जात आहे. शेंदलेले पाणी मन तृप्त होईपर्यंत पिता येते.
या नवीन तंत्रज्ञानाच्या विहिरीची रील केली आणि नेटकऱ्यांनी या 'रील'ला मोठी पसंती दिली. लाखो नेटकऱ्यांनी आखाडा बाळापूर नजीकची ही विहीर पसंतीस उतरली आहे.
विहिरीचे वैशिष्ट्य
आखाडा बाळापूर येथील व्यापारी तथा शेतकरी प्रदीप तुप्तेवार यांनी आपल्या नांदेड हिंगोली रोडवरील दाती शिवारातील शेतात विहीर खोदली. या विहिरीला सुरक्षित ठेवण्यासाठी व परिसरातील मुक्या जीवांना त्रास होऊ नये, यासाठी सुंदर कंपाउंड केले आहे. त्या कंपाउंडला आकाशी रंग दिलाय. विहिरीला रहाटाच्या ठिकाणी छान छपरी केली आहे. ती छपरी लक्ष वेधते आहे.
विहिरीचे आणि शेतकऱ्यांचे नाते सर्वश्रुत आहेच. कितीही बदल झाले तरी मातीची संस्कृती, नियमित वापरातल्या पारंपरिक वस्तू आणि त्यातून मिळणारे समाधान नवीन वापरातील वस्तूंच्या वापराने मिळत नाही.
पाण्याचे कितीही स्त्रोत निर्माण झाले तरी आड किंवा विहीर यातील शेंदलेले पाणी माणसाला तृप्त करते. तोच अनुभव कायम ठेवण्यासाठी पाणी शेंदण्याचे रहाट ही थोडीशी कष्टदायक बाब होती.
४० ते ५० फूट खोल विहिरीतले पाणी काढताना अक्षरशः दमछाक व्हायची; पण प्रदीप तुप्तेवार यांनी शेतात बांधलेल्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
विहिरीची रिल्स व्हायरल...
कुणीतरी या देखण्या विहिरीची रील तयार केलीय. ती रील फेसबुक, व्हॉटसॲप, इन्स्टाग्रामवर व्हायरल झालीय आणि लाखो नेटकऱ्यांनी या रीलला अमाप पसंत केले. ही पसंत पडलेली विहीर बाळापूर परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. (Viral Vihir Story)
हे ही वाचा सविस्तर :