Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > 'वसमत हळद' जीआय टॅगिंग अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांनो अधिकृत वापरासाठी आजच नोंदणी करा

'वसमत हळद' जीआय टॅगिंग अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांनो अधिकृत वापरासाठी आजच नोंदणी करा

'Vasmat Turmeric' GI tagging in final stages; Farmers register today for official use | 'वसमत हळद' जीआय टॅगिंग अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांनो अधिकृत वापरासाठी आजच नोंदणी करा

'वसमत हळद' जीआय टॅगिंग अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांनो अधिकृत वापरासाठी आजच नोंदणी करा

वसमत हळदीला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळवून देण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. या मानांकनाचा अधिकृत वापर करता यावा यासाठी हळद उत्पादकांना तातडीने नोंदणी करावी लागणार आहे. वसमत हळदीच्या जीआय टॅगिंग संदर्भात २७ जानेवारी रोजी ऑनलाइन आढावा घेण्यात आला.

वसमत हळदीला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळवून देण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. या मानांकनाचा अधिकृत वापर करता यावा यासाठी हळद उत्पादकांना तातडीने नोंदणी करावी लागणार आहे. वसमत हळदीच्या जीआय टॅगिंग संदर्भात २७ जानेवारी रोजी ऑनलाइन आढावा घेण्यात आला.

हिंगोली जिल्ह्याची ओळख असलेल्या वसमत हळदीला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळवून देण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. या मानांकनाचा अधिकृत वापर करता यावा यासाठी हळद उत्पादकांना तातडीने नोंदणी करावी लागणार आहे. वसमत हळदीच्या जीआय टॅगिंग संदर्भात २७ जानेवारी रोजी ऑनलाइन आढावा घेण्यात आला.

वसमत येथील सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि नाबार्ड यांच्या वतीने या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस पुणे येथील नाबार्डच्या कार्यालयातील विभागीय अधिकारी, हिंगोली येथील जिल्हा व्यवस्थापक लहाने, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी. पी. शेळके, सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

'वसमत हळद' जी.आय. टॅगचा अधिकृत वापर करण्यासाठी अधिकृत शेतकऱ्यांनी वापरकर्ता म्हणून नोंदणी प्रक्रियेवर विशेष भर देण्यात आला. ही प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने सूर्या एफपीसीला सहकार्य करावे. तसेच शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना पुणे येथील नाबार्डकडून देण्यात आल्या.

डॉ. पी. पी. शेळके म्हणाले, प्रल्हाद बोरगड व सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने वसमतच्या हळदीला राष्ट्रीय व जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. या प्रक्रियेत कृषी विज्ञान केंद्र पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील.

भविष्यातील बाजारपेठ, दरवाढ आणि हळदीच्या ब्रँडिंगचा लाभ लक्षात घेता वसमत व परिसरातील सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या तेलगाव (ता. वसमत) येथील कार्यालयात संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. शेळके यांनी केले. या बैठकीस डॉ. हरिदास जटाळे यांच्यासह इतर मान्यवरही ऑनलाइन उपस्थित होते.

नोंदणीसाठी असे लागणार कागदपत्र

शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली असून, अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणीसाठी हळद पीक पेरा दर्शविणारा सातबारा उतारा, आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणि केवळ १० रुपये नोंदणी शुल्क आवश्यक आहे.

हेही वाचा : मंदीच्या लाटेत देखील 'हा' शेतकरी म्हणतोय मेथीची एक जुडी देतेय ५० रुपयांचे उत्पन्न; वाचा सविस्तर

Web Title : वसमत हल्दी जीआई टैग अंतिम चरण में; किसान अभी पंजीकरण कराएं!

Web Summary : वसमत हल्दी का जीआई टैगिंग लगभग पूरा हुआ। किसानों से सूर्या फार्मर प्रोड्यूसर कंपनी के साथ अधिकृत उपयोग के लिए पंजीकरण कराने का आग्रह किया गया। पंजीकरण के लिए न्यूनतम दस्तावेजों और मामूली शुल्क की आवश्यकता है।

Web Title : Vasmat Turmeric GI Tag Final Stage; Farmers Register Now!

Web Summary : Vasmat turmeric's GI tagging nears completion. Farmers urged to register with Surya Farmer Producer Company for authorized use. Registration requires minimal documents and a nominal fee.