म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावू नये, अशी म्हण आहे. ही म्हण तंतोतत ऊसतोडणीबाबत लागू होते. १८ महिने पोटच्या पोरासारखं जपून ऊस पिकवायचा अन् तोडणीवेळी मात्र मागेल तेवढी खुशाली द्यायचा, असा इंग्रजांनाही लाजवणारा प्रकार सुरू आहे. कारखानदारांची नरमाई, संघटनांचा क्षीण झालेला आवाज, घटलेले वजन, अशा भाराभर समस्या आहेत. खुशालीची कशी झाली खंडणी अन् खंडणीचा काळ कसा सोकावतोय, यावर जळजळीत प्रकाश टाकणारी मालिका आजपासून...
शरद यादव
गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात खुशालीच्या नावाखाली शेतकऱ्यांना नागवण्याचा कार्यक्रम सुरू होता. अमुक एवढे पैसे दिले तर उसाला कोयता, त्यात ट्रॅक्टरचालकाची एन्ट्री असे प्रकार चोरीछुपे सुरू होते. यंदा मात्र खुशालीच्या नावाखाली खंडणी उकळण्याचे प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात राजरोस सुरू असल्याचे चित्र आहे.
गुंठ्याला १०० रुपये म्हणजेच एकरी चार हजार, चालकाची एन्ट्री प्रतिखेप ३०० व ट्रॅक्टर अडकला तर ओढायला ट्रॅक्टर आणण्याचा खर्च असा सारा व्यवहार जमला तरच ऊस तोडला जात आहे. विशेष म्हणजे हा सारा मामला उघडा-उघड चालू असून, यावर कोणीही बोलायला तयार नसल्याने खंडणीचा फास शेतक-यांचा गळा आवळू लागला आहे.
खुशाली की खंडणी' अशी वृत्तमालिका प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेऊन प्रादेशिक साखर संचालक कार्यालय, पूणे यांनी जर शेतकऱ्यांकडून तोडणीसाठी पैसे मागितल्याची तक्रार आली तर संबंधित ट्रॅक्टरमालक व तोडणी टोळीच्या बिलातून हे पैसे कापण्याचा कायदा केला. याबाबत सर्व साखर कारखान्यांना तसे पत्र पाठवून कुठेही पैशाची तक्रार आल्यास कारवाईचे निर्देश दिले.
परंतु कोल्हापूर जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याने अद्याप याबाबत तक्रार केलेली नाही. कारण जर तक्रार केली तर पुढील हंगामात माझा ऊसच तोडणार नाहीत, अशी भीती त्याला वाटते. या भीतीनेच खंडणीचा राक्षस मोठा झाला असून, आता त्याला आवरणे कोणाच्याच हातात राहिलेले नाही. (क्रमश:)
ऊस तोडणी-वाहतूक दर (रुपये प्रतिटन)
३६६ - तोडणी
४५० - मशीनने तोडणी
४५९ - ट्रैक्टर वाहतूक २५ कि मी. पर्यंत
४०५ - बैलगाडी वाहतूक २५ कि. मी. पर्यंत
२०% - टोकी प्रमुखाला मिळणारे कमिशन
३०% - ट्रैक्टर मालकाला मिळणारे कमिशन
ऊस काय डांबरी रस्त्यावर लावू काय.....
● रानात थोडी ओल आहे, ऊस पडला आहे, वाडे कभी निघते, वाहतूक कराची लागते, ऊस खूपच लांबडा आहे, अशी अनेक कारणे सागून टोळीवाले तोडणी नाकारतात. अडचणीत आहे म्हणून तोडणार नसाल तर ऊस काय द्वांबरीवर लागू काय, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.
● अनेक गावांत तोडकरी टोळीला सकाळी राहिलेल्या ठिकाणाहून पिकअप गाडीने आणायचे व सायंकाळी पुन्हा सोडायचे, याचा खर्च शेतकऱ्याला करावा लागतो. यासाठी गाडी भाडे म्हणून रोजचे हजार रुपये मोजावे लागतात. मऊ सापडलं की कोपरानं खणायचं, असाच हा प्रकार आहे.
● जून, जुलैमध्ये लावण केलेला 1 ऊस जोमदार वाढतो. उसाला ५० ते ६० पेरे येतात. ऊस पडल्यामुळे तोडताना थोडा त्रास होतो, असा ऊस तोडण्यास टोळीवाले नाखूष असतात. हा ऊस गुंक्याला दोन टनाने पडतो. पण हाच ऊस जर तोडकरी तोडणार नसतील तर चांगली शेती करायचीच नाही का, अशी विचारणा प्रगतशील शेतकरी करत आहेत.
ट्रॅक्टर अडकला तर दुसरे वाहन बोलवा
रानात थोडी ओल असेल तर काहीवेळा भरलेला ट्रॅक्टर अडकतो. यावेळी शेतकऱ्यालाच दुसरा ट्रैक्टर आणण्यास सांगितले जाते. पाच मिनिटात ट्रैक्टर बाहेर काढला की त्या ट्रॅक्टरचे पाचशे रुपये भाई शेतकऱ्याकडून वसूल केले जाते. तरीही ट्रैक्टर निघाला नाहीं तर जेसीबी डोलावण्यास सांगितले जाते. त्या जेसीबीचे भाडे दोन हजार रुपये. हे सर्व पाहून ऊस लावलाच कशाला, असेच शेतकऱ्याला वाटत राहते.
खंडणीचा प्रकार वाढण्यास शेतकरीच जबाबदार आहे. कारखाना सुरू झाला की माझा ऊस कधी जातोय, यासाठीच शेतकरी नुसता पळत असतो, यामुळेच लाचखोरी वाढली आहे. एकाही शेतकऱ्यााने माझ्या उसाला तोड या म्हणून जाऊ नये, महिन्यात ही यंत्रणा सुतासारखी सरळ येईल. तसेच कारखानदार कायम साखरेला भाव नाही, असे रडत असतात. भारतात सर्व घटक मागण्यांसाठी संप करतात तसे कारखानदारांनीही साखर दरासाठी संप करावा केवळ पोकळ ओरडून काही होणार नाही. - सदाशिव कुलकर्णी, राज्य संघटक, जय शिवराय किसान संघटना.
तुमचा ऊस तुम्हीच तोडा अन् बांधावर ठेवा
● कोल्हापूर जिल्ह्यात करवीर व राधानगरी तालुक्यात अल्पभूधारकांचे प्रमाण जास्त आहे. ५ ते २० गुंठे ऊस असणाऱ्या शेतकयांचा तर करेक्ट कार्यक्रम केला जात आहे. ऊस तोडून बांधावर आणून ठेवा, आम्ही सवडीने घेऊन जातो, असे त्याला सांगितले जाते.
● हा शेतकरीही रान मौकले करायच्या नादात चार वैरणीसाठीचे केलेले मित्र व घरची माणसं घेऊन ऊस तोडतो, मोक्या बांधून सर्व ऊस बांधावर नेऊन ठेवतो. यानंतर तोडलेला आयता ऊस ट्रैक्टरवाले भरून नेतात, वर ऊस नेला म्हणून शेतकऱ्याकडून जेवणही मागतात.
● यात तोडणीसह वाहतुकीचे पैसेही ट्रैक्टरवाला घेतो. शेतकयानेच ऊस तोडला असेल तर त्याचे पैसे घेताना या यंत्रणेला लाज कशी वाटत नसेल.