छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दाणादाण उडवून दिली आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना अधिक, तर इतर जिल्ह्यांना कमी प्रमाणात पावसाने दणका दिला.
वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने ५३ गावांतील १ हजार ५९४ शेतकऱ्यांच्या ८७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान (crops damaged) केले आहे.
विभागाने प्रशासनाने नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४, परभणीतील १, बीडमधील १, लातूर ३७ अशा ५३ गावांमध्ये अवकाळीने थैमान घातले. बीडमध्ये १ जणाचा वीज पडून मृत्यू झाला. (Unseasonal Rain)
लहान-मोठी मिळून १५ जनावरे दगावली. छत्रपती संभाजीनगर मधील ६८८ हेक्टर, परभणीतील ३.२, बीडमधील ०.९० हेक्टर, तर लातूरमधील १७८, असे ८७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिरायत २२७.६ हेक्टर, तर बागायत ५६६.६ व ७७.५ हेक्टरवरील फळपिकांना अवकाळीमुळे फटका बसला.
जिल्हा | गावे | नुकसान |
छ. संभाजीनगर | १४ | ६८८ हेक्टर |
परभणी | ०१ | ३.२ हेक्टर |
बीड | ०१ | ०.९० हेक्टर |
लातूर | ३७ | १७८ हेक्टर |
एकूण | ५३ | ८७१ हेक्टर |