Join us
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञाताने लावली शेतातील 'मका'च्या गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:57 IST

यावल-भुसावळ रस्त्यावर यावल शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत गट क्रमांक १०४१ मधील कापून ठेवलेला मका अज्ञात व्यक्तीने जाळल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.

जळगाव जिल्ह्याच्या यावल-भुसावळ रस्त्यावर यावल शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत गट क्रमांक १०४१ मधील कापून ठेवलेला मका अज्ञात व्यक्तीने जाळल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

दरम्यान शेतात अचानक आग लागल्याने मोठ्या क्षेत्रातील मका जळून खाक झाली. या घटनेची माहिती संबंधित शेतकऱ्याने दिल्यानंतर यावल नगरपरिषदेच्या भाजप सदस्य नंदा महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार जाणूनबुजून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

महसूल विभागाने केला पंचनामा

• शेतकऱ्याने सांगितले की, मका पिकासाठी पेरणीपासून आतापर्यंत बियाणे, खत, औषध फवारणी, मजुरी व सिंचन यावर सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च झाला होता.

• काढणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक जळाल्याने संपूर्ण गुंतवणूक वाया गेली आहे. दरम्यान, या घटनेचा महसूल विभागाकडून पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : गणूदादा यांच्या नवीन जुगाड तंत्राने ट्रॅक्टरद्वारे पेरणी केल्यावर दांड पाडणे आता होणार सोपे

English
हिंदी सारांश
Web Title : Unknown arsonist sets corn stalks ablaze; farmer suffers heavy losses.

Web Summary : An unknown person set fire to harvested corn in Yaval, Jalgaon, causing estimated losses of ₹2.5 lakhs for the farmer. Authorities suspect arson. Revenue department investigates the incident after the farmer reported significant investment losses.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीजळगावमकाबाजारपोलिस