केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज म्हणजेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला काय मिळालं पाहूया सविस्तर.
१) कृषी, आरोग्य, इनोव्हेशनमध्ये एआयचा वापर करणार बिहारमध्ये फूड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट इन्स्टिट्युट सुरू करणार. याशिवाय देशात एआयच्या अभ्यासाठी तीन केंद्र उभारली जाणार. कृषी, आरोग्य, इनोव्हेशनमध्ये एआयचा वापर करणार. वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षात १० हजार जागा वाढवल्या जाणार. ५ वर्षांमध्ये ७५ हजार जागा वाढवल्या जाणार. भारतीय भाषांमधील पुस्तकांना चालना देणार. सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० ची सुरूवात करणार.
२) किसान क्रेडिट कार्डावरील कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख उत्तम प्रतीच्या कापूस उत्पादनासाठी योजना सुरू करणार. युरिया उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करणार. किसान क्रेडिट कार्डावरील कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
३) कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी पावलं उचलली जाणार कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी पावलं उचलली जाणार. डाळींसाठी ६ वर्षांसाठी आत्मनिर्भरता योजनेची घोषणा. केंद्राच्या एजन्सी पुढील ४ वर्षांत तूर, उदड आणि मसुर डाळ खरेदी करणार. बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना केली जाणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
४) राज्यांसोबत पीएम कृषी धान्य योजना सुरू करणार अर्थसंकल्पातून निर्यात वाढवण्याचे प्रयत्न करणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. राज्यांसोबत पीएम कृषी धान्य योजना सुरू करणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. योजनेंतर्गत १०० जिल्ह्यांना विशेष फायदा होणार आहे. याचा फायदा देशातील १.७ कोटी शेतकऱ्यांना होणार.
५) इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदलइन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल. १२ लाखांपर्यंत कोणताही कर नाही.