Lokmat Agro >शेतशिवार > Tur Kharedi : केंद्र सरकार पीएसएस योजनेअंतर्गत १०० टक्के तूर खरेदी करणार

Tur Kharedi : केंद्र सरकार पीएसएस योजनेअंतर्गत १०० टक्के तूर खरेदी करणार

Tur Kharedi : Central government will purchase 100 percent tur under PSS scheme | Tur Kharedi : केंद्र सरकार पीएसएस योजनेअंतर्गत १०० टक्के तूर खरेदी करणार

Tur Kharedi : केंद्र सरकार पीएसएस योजनेअंतर्गत १०० टक्के तूर खरेदी करणार

डाळींचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने २०२४-२५ या खरेदी वर्षात मूल्य समर्थन योजनेअंतर्गत तूर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.

डाळींचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने २०२४-२५ या खरेदी वर्षात मूल्य समर्थन योजनेअंतर्गत तूर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

डाळींचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने २०२४-२५ या खरेदी वर्षात मूल्य समर्थन योजनेअंतर्गत (पीएसएस) राज्याच्या उत्पादनाच्या १००% समतुल्य तूर, उडीद आणि मसूर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.

सरकारने २०२५ च्या अर्थसंकल्पात अशी घोषणा देखील केली आहे की देशातील डाळींमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी २०२८-२९ पर्यंत पुढील चार वर्षांसाठी राज्याच्या उत्पादनाच्या १००% तूर, उडीद आणि मसूर खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सींद्वारे केली जाईल.

त्यानुसार, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी २०२४-२५ च्या खरीप हंगामात मूल्य समर्थन योजनेअंतर्गत आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये एकूण १३.२२ लाख मेट्रिक टन तूर (अरहर) खरेदी करण्यास मान्यता दिली.

शेतकऱ्यांच्या हितासाठी आंध्र प्रदेशात ९० दिवसांचा खरेदीचा कालावधी आणखी ३० दिवसांनी वाढवून पुढील महिन्याच्या २२ तारखेपर्यंत खरेदी करण्यासही मंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत एमएसपीवर खरेदी सुरू आहे.

या महिन्याच्या २२ तारखेपर्यंत या राज्यांमध्ये एकूण ३.९२ लाख मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आली आहे ज्याचा फायदा या राज्यांतील २,५६,५१७ शेतकऱ्यांना झाला आहे.

नाफेडच्या ई-समृद्धी पोर्टल आणि एनसीसीएफच्या ई-संयुक्ती पोर्टलवर पूर्व-नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून देखील तूर खरेदी केली जाते.

भारत सरकार नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सींद्वारे शेतकऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या किमान आधारभूत किमतीवर तुरीची १०० टक्के खरेदी करण्यास कटिबद्ध आहे.

अधिक वाचा: आता पिक विमा योजनेत नुकसान भरपाई मिळणार या निकषांवर; जाणून घ्या सविस्तर

Web Title: Tur Kharedi : Central government will purchase 100 percent tur under PSS scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.