Lokmat Agro >शेतशिवार > कृषी विज्ञान केंद्र गांधेलीच्या वतीने शेतकरी बांधवांना अद्रक पिकाच्या आधुनिक व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण

कृषी विज्ञान केंद्र गांधेलीच्या वतीने शेतकरी बांधवांना अद्रक पिकाच्या आधुनिक व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण

Training on modern management of ginger crop to farmers on behalf of Krishi Vigyan Kendra Gandheli | कृषी विज्ञान केंद्र गांधेलीच्या वतीने शेतकरी बांधवांना अद्रक पिकाच्या आधुनिक व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण

कृषी विज्ञान केंद्र गांधेलीच्या वतीने शेतकरी बांधवांना अद्रक पिकाच्या आधुनिक व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण

गोळेगांव तालुका खुलताबाद येथे बुधवार (दि.१०) रोजी एम जी एम कृषी विज्ञान केंद्र (MGM KVK) गांधेली छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने अद्रक उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला होता.

गोळेगांव तालुका खुलताबाद येथे बुधवार (दि.१०) रोजी एम जी एम कृषी विज्ञान केंद्र (MGM KVK) गांधेली छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने अद्रक उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला होता.

शेअर :

Join us
Join usNext

गोळेगांव तालुका खुलताबाद येथे बुधवार (दि.१०) रोजी एम जी एम कृषी विज्ञान केंद्र गांधेली छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने अद्रक उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला होता.

या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशषज्ञ शरद अवचट यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अद्रक पिकात सध्या करावयाची कामे तसेच सड व इतर प्रादुर्भाव होऊ नये, या करिता भविष्यातील उपाय योजना संदर्भात मार्गदर्शन केले.

तसेच सध्या सर्वत्र अद्रकाची उगवण पूर्ण झाली असून पिक व्यवस्थित आहे. पावसाचे पाणी शेतात थांबू देऊ नये तसेच ज्या ठिकाणी विरळ उगवण आहे अशा ठिकाणी अधीक उगवण झालेल्या ठिकाणची रोपे स्थलांतरित करावी. भविष्यातील कंद कुज व हुमनीचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता बेडवर जैविक कीड व बुरशी नशकाचा एकरी २ किलो वापर करावा. तसेच बेड च्या बागलेला पत्ता कोबी आणि झेंडू ची रोपे लावावी. यामधून अतिरिक्त उत्पादन सुद्धा मिळेल असे अवचट यांनी संगितले. 

तर विषय विशेषज्ञ मृद विज्ञान स्वप्नील वाघ यांनी खत व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी खते देताना पेरून द्यावीत जेणे करून ती माती आड होतील व पिकांना अधिक फायदा होईल असे संगितले. तसेच खतांचा अतिरिक्त वापर टाळावा असे आवाहन केले. यासोबतच खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी खतांचा ड्रिप द्वारे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा स्लरी च्या माध्यमातून वापर करावा असेही संगितले. 

यावेळी गोळेगाव परिसरातील अनेक अद्रक उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

हेही वाचा - मराठवाड्याचा 'हा' शेतकरी ऐन आषाढात कमवत आहे महिना लाख रुपये  

Web Title: Training on modern management of ginger crop to farmers on behalf of Krishi Vigyan Kendra Gandheli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.