Join us
Daily Top 2Weekly Top 5

हवामानातील बदलामुळे हापूसवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 14:59 IST

हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. हवामानातील बदलाचा अंदाज घेत दर १० ते १५ दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे.

रत्नागिरी: हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. हवामानातील बदलाचा अंदाज घेत दर १० ते १५ दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. कीटकनाशके महागडी असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातीलच नव्हे तर परदेशी नागरिकांना भुरळ घातलेल्या आंबा पिकावर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. फयान वादळानंतर जिल्ह्यातील आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत असल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसत असून, बागायतदारांची आणि पर्यायाने जिल्ह्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवली. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच आंब्याला मोहोर सुरू झाला.

अवकाळी पावसामुळे मोहोरावर परिणाम झाला. काही ठिकाणी मोहोर खराब झाला. दुसऱ्या व तिसऱ्या टप्यात मोहोर मात्र टिकून आहे. पहिल्या मोहोराचा आंबा पाच ते दहा टक्केच शिल्लक राहिला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सर्वत्र मोहोर चांगला आला आहे. काही ठिकाणी फळधारणा अद्याप व्हायची आहे, तर हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. हवामानातील बदलाचा अंदाज घेत दर १० ते १५ दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. कीटकनाशके महागडी असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

अधिक वाचा: आंबा फळ पिकातील मोहोराचे संरक्षण कसे कराल?

देशातीलच नव्हे तर परदेशी नागरिकांना भुरळ घातलेल्या आंबा पिकावर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. फयान वादळानंतर जिल्ह्यातील आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत असल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसत असून, बागायतदारांची आणि पर्यायाने जिल्ह्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवली. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच आंब्याला मोहोर सुरू झाला. अवकाळी पावसामुळे मोहोरावर परिणाम झाला. काही ठिकाणी मोहोर खराब झाला. दुसऱ्या व तिसऱ्या टप्यात मोहोर मात्र टिकून आहे. पहिल्या मोहोराचा आंबा पाच ते दहा टक्केच शिल्लक राहिला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सर्वत्र मोहोर चांगला आला आहे. काही ठिकाणी फळधारणा अद्याप व्हायची आहे, तर प्रत्येक फवारणीत २० ते २५ दिवसांचा फरक असणे आवश्यक आहे. मात्र, कीटकनाशकांचा प्रभाव पडत नसल्याने १० ते १५ दिवसाने फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे.

पावसाळी ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य कीडरोगाचा प्रभाव वाढला होता, त्यासाठी उपाययोजना करून कीडरोगावर नियंत्रण आणले आहे; परंतु ढगाळ हवामान, थंडी यामुळे आता थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. थ्रीप्स आटोक्यात आणण्यासाठी बागायतदारांना महागड्या कीटकनाशकांचा वापर करावा लागत आहे. बाजारात महागडी कीटकनाशके असली तरी थ्रीप्स वेळीच नियंत्रणात येणे गरजेचे आहे. आंब्यावरील कीडरोग, तुडतुडा, थ्रीप्स नियंत्रणासाठीच्या कीटकनाशकांच्या किमती अधिक वाढल्या असल्याने आंबा पीक खर्चिक बनले आहे.

टॅग्स :आंबाकीड व रोग नियंत्रणशेतीपीकरत्नागिरीकोकणशेतकरी