Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील 'या' जिल्ह्याचा यंदा मूग, उडदाचा पेरा घटला; सोयाबीन, कापूस, तुरीचे क्षेत्र वाढले

राज्यातील 'या' जिल्ह्याचा यंदा मूग, उडदाचा पेरा घटला; सोयाबीन, कापूस, तुरीचे क्षेत्र वाढले

This year, the sowing of moong and urad in this district of the state has decreased; the area under soybean, cotton and tur has increased | राज्यातील 'या' जिल्ह्याचा यंदा मूग, उडदाचा पेरा घटला; सोयाबीन, कापूस, तुरीचे क्षेत्र वाढले

राज्यातील 'या' जिल्ह्याचा यंदा मूग, उडदाचा पेरा घटला; सोयाबीन, कापूस, तुरीचे क्षेत्र वाढले

खरीप हंगामातील पेरणी आटोपत आली असून आतापर्यंत ८५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मूग, उडीदचा पेरा वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांची पसंती सोयाबीन, कापूस, तूर आदी नगदी पिकांनाच दिसत आहे.

खरीप हंगामातील पेरणी आटोपत आली असून आतापर्यंत ८५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मूग, उडीदचा पेरा वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांची पसंती सोयाबीन, कापूस, तूर आदी नगदी पिकांनाच दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी आटोपत आली असून आतापर्यंत ८५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मूग, उडीदचा पेरा वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांची पसंती सोयाबीन, कापूस, तूर आदी नगदी पिकांनाच दिसत आहे.

हिंगोली जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस झाला नसला तरी अनेक भागात पेरण्यांना गती आली. बहुतांश भागातील पिके जोमदार असून आतापर्यंत जवळपास ३ लाख ४७ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा ज्वारी, मूग, उडीद आदी पिकांचा पेरा वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांनी नगदी पिकांनाच पसंती दिल्याचे पेरणी अहवालावरून दिसून येत आहे.

सोयाबीननंतर रब्बीमध्ये हरभरा, करडई आदी पिके घेण्याकडे कल वाढल्याने सोयाबीनचा पेरा दरवर्षी वाढत आहे. आतापर्यंत २ लाख ६९ हजार ११३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे यंदा कापूस लागवडीलाही शेतकऱ्यांची पसंती दिसत आहे. जवळपास ३० हजार ४०० हेक्टरपर्यंत कापसाची लागवड होईल, असा अंदाज होता.

मात्र, आतापर्यंत ३६ हजार ६३० हेक्टरवर लागवड झाली आहे. तुरीचा पेरा ३१ हजार ५४८ हेक्टरवर झाला आहे. दरम्यान, बाजरी, भात पीक हद्दपारच होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी काही शेतकरी बाजरी पीक घेत होते. मका, तीळ, कारळ, भुईमूग पिकाचाही काही ठिकाणी पेरा झाला आहे.

ज्वारीऐवजी सोयाबीन पीक बनले प्रमुख

जिल्ह्यात काही वर्षापूर्वी ज्वारी पीक हे प्रमुख पीक म्हणून ओळखले जात होते. मात्र, नगदी पिकाकडे कल वाढल्याने ज्वारीऐवजी सोयाबीनला पसंती दिली जात आहे. आतापर्यंत ज्वारीची पेरणी २ हजार ५६१ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.

तुरीचे क्षेत्र वाढले; मूग, उडीदच्या पेऱ्यात घट !

जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात ३० हजार ९९७ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता. यंदा आतापर्यंत ३१ हजार ५४८ हेक्टरवर झाला आहे. मात्र, गतवर्षी मुगाचे क्षेत्र ५ हजार २९३ हेक्टरवर होते. यंदा ४ हजार २५२ हेक्टरवर पेरणी झाली. उडीद पिकाचा पेरा ३ हजार १५२ हेक्टरवर झाला आहे. गतवर्षी ३ हजार ९०५ हेक्टर होता.

१८२१ हेक्टरवर नवीन ऊस लागवड

यंदा १८२१ हेक्टर क्षेत्रावर नवीन ऊस लागवड झाली आहे. गतवर्षी प्रमुख धरणात पाणीसाठी बन्यापैकी झाला होता. यंदाही धरणसाठ्यात वाढ होईल व पिकांना पाणी पाळ्या मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

तालुकानिहाय पीक व पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक हिंगोली कळमनुरी वसमत औंढा ना. सेनगाव 
ज्वारी १९६ ३६५ ३५९ ७७० ७८१ 
तूर ८११६ ४९३९ १७९७ ३४५० १३२४६ 
मूग ३१२ ६१९ ९७४ १६०५ ७४२ 
उडीद ३३२ ४८५ ५५३ १०५० ७३२ 
सोयाबीन ५१४८३ ५०५०५ ४९९२७ ४३५०० ७३६९८ 
कापूस ६५२३ ९१०५ १००५६ ६४३५ ४५०९ 

हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी

Web Title: This year, the sowing of moong and urad in this district of the state has decreased; the area under soybean, cotton and tur has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.