सतीश पाटील
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर यंदा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी विक्रमी उत्साह दाखवला. गेल्यावर्षी राज्यभरात १० हजार ट्रॅक्टरची विक्री झाली होती, तर यंदा हा आकडा तब्बल २१ हजारांवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक विक्री झाली असून, या विक्रीतून जवळपास १०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली असल्याचे ट्रॅक्टर डीलरनी सांगितले आहे.
या वर्षी विक्रीतील वाढीमागे अनेक सकारात्मक घटक कारणीभूत ठरले आहेत. केंद्र सरकारने ट्रॅक्टरवरील जीएसटी दरात कपात केली आहे. पूर्वी १२ टक्के असलेला दर आता ५ टक्क्यांवर आणल्यामुळे ट्रॅक्टर स्वस्त झाले. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांना सुलभ अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.
याशिवाय शासनाकडून ट्रॅक्टर खरेदीसाठी एक लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. या सवलतींमुळे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर खरेदीकडे ओढा वाढला. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने शेतीची कामे वाढली आहेत. पारंपरिक शेतीपासून आधुनिक शेतीकडे वाटचाल करताना ट्रॅक्टर हे महत्त्वाचे साधन ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन ट्रॅक्टर खरेदीला प्राधान्य दिल्याचे खरेदीच्या आकड्यांवरून दिसून येत आहे. अनेक ठिकाणी डीलर्सकडे उपलब्ध ट्रॅक्टरची संख्या अपुरी पडली. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत विक्रीचा आकडा विशेषतः वाढलेला दिसून येत आहे. खरेदी वाढल्यामुळे ट्रॅक्टर उद्योगाला बूस्ट मिळाला आहे.
दसऱ्याला यंदा ट्रॅक्टरची विक्रमी विक्री झाली आहे. महाराष्ट्रात गेल्यावर्षी १० हजार तर यंदा २१ हजार ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. जवळपास १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल महाराष्ट्रात झाली आहे. ही समाधानाची बाब आहे. - संजय चव्हाण, उद्योजक, ट्रॅक्टर डीलर.
मजुरांची कमतरता, मागणीत वाढ
गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या ग्रामीण भागात शेत मजुरांचा मोठा जाणवत आहे. त्याचप्रा कमी झाल्यामुळे छोट्यामोठ्या कामाला सुद्धा ट्रक्टरची मागणी वाढली आहे.
यंदा पाऊस चांगला झाला आहे. जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आला आहे शासनाचे अनुदान मिळतेय. शेतीसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वाटचाल आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्यात उत्साह आहे - उदय लोखंडे, ज्येष्ठ उद्योजक, ट्रॅक्टर डीलर.
शासनाने कमी केलेला जीएसटी यामुळे शेतकऱ्यांनी २२ सप्टेंबरनंतर ट्रॅक्टर खरेदीला प्रचंड प्रमाणात उत्साह दाखवला. ज्याप्रमाणे शेअर मार्केटमध् न्साह किंवा उलाढाल होते, तशी उलाढाल ट्रॅक्टर विक्रीतून झाली आहे. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदीला मोठ्या प्रमाणात उत्साह दाखवला. - तातोबा पाटील, ट्रॅक्टर डीलर, शिरोळ.