नासीर कबीर
करमाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास महाराष्ट्र राज्यातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे.
तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण व त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महाडीबीटीवर येणाऱ्या सर्व योजनांमध्ये निधी वितरणात मागील सलग ३ वर्षे राज्यात प्रथम क्रमांकावर करमाळा तालुका आहे.
कार्यालयाने राबविलेले उपक्रम
१) केळी पीक क्षेत्र विस्तार व निर्यात हबसाठी केलेले कार्य.
२) ठिंबक सिंचन व यांत्रिकीकरणमध्ये पुणे विभागात सर्वोच्च काम व अनुदान वाटप.
४) शेतकरी व कर्मचारी यांच्यासाठी शुद्ध जल.
५) आपत्कालीन व्यवस्थापनासाठी अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी.
६) मौखिक व लेखी मार्गदर्शन.
७) शेतकरी अभिप्राय.
८) कृषी ग्रंथालय.
९) कृषी वस्तू संग्रहालय.
१०) अद्यावत शेतकरी माहिती व प्रशिक्षण कक्ष.
११) नगण्य प्रलंबितता.
१२) फ्लो चार्ट.
१३) माहिती चार्ट.
१४) अभिलेख वर्गीकरण.
१५) सुसज्ज बैठक व्यवस्था.
१६) प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यास आईच्या नावासह नाव निर्देशित प्लेट.
१७) सर्वाना आयकार्ड.
१८) सर्वधर्म समभावसाठी एक गणवेश.
१९) तालुका कृषी अधिकारी कार्यक्षेत्रातील सर्व गावांचा अद्यावत मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये सुपीकता निर्देशांक चार्ट.
२०) अधिकारी कर्मचारी यांचे गावभेटीच्या दिवसासह सूक्ष्म नियोजन.
आदी अनेक बाबींची अंमलबजावणी नंतर सर्वेक्षण व अंकेक्षण, ऑडिटवर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा मानांकन मिळवण्याचा मान या कार्यालयास प्राप्त झाला आहे.
अधिक वाचा: महाराष्ट्रातील टॉप ५ कृषी उत्पन्न बाजार समित्या कोणत्या? कुणाला मिळाले किती स्टार? वाचा सविस्तर