सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्यात कार्यरत प्रत्येक घटकाचा या पुरस्कारामध्ये मोलाचा वाटा आहे. यामुळे महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राची शान वाढली असून बारामती सहकारी उद्योगाला राष्ट्रीय पातळीवर चांगली ओळख मिळाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट करत बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कौतुक केले आहे.
नुकतेच सोमेश्वर कारखान्याला पुणे-मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने राज्यातील उत्कृष्ट साखर कारखाना म्हणून पुरस्कार दिला आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्तिपत्र तसेच रोख पाच लाख रुपये असे आहे.
यापूर्वी कारखान्याला मिळालेले पुरस्कार◼️ उत्कृष्ट कार्यकारी संचालक.◼️ उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर◼️ उत्कृष्ट चीफ केमिस्ट.◼️ उत्कृष्ट आर्थिक नियोजन.◼️ उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता.◼️ देशपातळीवर सर्वोत्कृष्ट कारखाना.◼️ कोजन असोसिएशनचा देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट पुरस्कार.◼️ देशपातळीवर उत्कृष्ट डिस्टिलरी पुरस्कार यांसारखे पुरस्कारही मिळवले आहेत.
सन २०२३-२४ च्या देशपातळीवरील नॅशनल फेडरेशनच्या सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कारासह, २०२४-२५ च्या व्हीएसआयच्या सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्काराचा मानही सोमेश्वर कारखान्याला मिळाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर कारखान्याचे कामकाज सुरू आहे. कारखान्याला या पुरस्काराबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुकाची थाप दिली व अभिनंदन केले आहे.
फेसबुकवर पोस्ट करत केले सर्वांचे अभिनंदन◼️ उपमुख्यमंत्री पवार यांनी फेसबुकवर पोस्ट करत सर्वांचे अभिनंदन केले आहे.◼️ त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोमेश्वर साखर कारखान्याला गाळप हंगाम २०२४-२५ साठी वसंतदादा पाटील साखर संस्थेचा सर्वोत्तम साखर कारखाना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, ही अतिशय आनंदाची बाब आहे.◼️ हा पुरस्कार उत्कृष्ट आर्थिक नियोजन, उत्तम तांत्रिक क्षमता, ऊस विकास, नफा निर्देशांक व व्यवस्थापनाच्या जोरावर प्राप्त झालाय.
महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राची शान वाढली◼️ कारखान्यात कार्यरत प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे.◼️ महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राची शान वाढली आहे आणि बारामती सहकारी उद्योगाला राष्ट्रीय पातळीवर चांगली ओळख मिळाली आहे.◼️ या यशामुळे महाराष्ट्राच्या सहकारी साखर उद्योगाचे भविष्य अधिक उज्ज्चल व उत्कर्षाच्या दिशेने झेपावले आहे.
अधिक वाचा: गेल्या वर्षीपेक्षा यंदा राज्यात जादा ऊस गाळप; 'हा' जिल्हा साखर उताऱ्यात नंबर एकवर
Web Summary : Someshwar Cooperative Sugar Factory, Baramati, recognized as best nationally and in Maharashtra by VSI. Ajit Pawar praised the factory's financial planning, technical efficiency, and contribution to Maharashtra's cooperative sector, highlighting its bright future.
Web Summary : सोमेश्वर सहकारी चीनी मिल, बारामती, वीएसआई द्वारा राष्ट्रीय और महाराष्ट्र में सर्वश्रेष्ठ के रूप में मान्यता प्राप्त। अजित पवार ने मिल की वित्तीय योजना, तकनीकी दक्षता और महाराष्ट्र के सहकारी क्षेत्र में योगदान की सराहना की, और इसके उज्ज्वल भविष्य पर प्रकाश डाला।