Join us

मागील गाळप हंगामासाठी 'या' साखर कारखान्याने उसाचा अंतिम हप्ता केला जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:12 IST

Sugarcane FRP २०२४-२५ हंगामात कारखान्याने कार्यक्षेत्र व परिसरातील ११ लाख ३८ हजार ४९६ मे टन ऊस गाळप केले. यापूर्वी एफ. आर. पी. नुसार ३,०८० रुपये प्रति मे. टनप्रमाणे ३५० कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित आले आहेत.

अवसरी : दत्तात्रय नगर, पारगाव तर्फ अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२४-२५ गाळप हंगामासाठी अंतिम हप्ता २१० रुपये प्रति मे. टन जाहीर केला आहे.

यामुळे एकूण ऊस दर ३,२९० रुपये प्रति मे. टन निश्चित झाला आहे. ही माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

संस्थापक-संचालक व महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

२०२४-२५ हंगामात कारखान्याने कार्यक्षेत्र व परिसरातील ११ लाख ३८ हजार ४९६ मे टन ऊस गाळप केले. यापूर्वी एफ. आर. पी. नुसार ३,०८० रुपये प्रति मे. टनप्रमाणे ३५० कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित आले आहेत.

करण्यात अंतिम हप्ता २१० रुपये प्रति मे. टन निश्चित करण्यात आला असून, यातून शिक्षण संस्था निधी १० रुपये आणि भाग विकास निधी २५ रुपये प्रति मे. टन याप्रमाणे ३५ रुपये वजा केल्यानंतर १७५ रुपये प्रति मे. टन शिल्लक राहतो.

याप्रमाणे १९ कोटी ९२ लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी जमा होणार आहेत.

परंपरा कायम राहीलबाळासाहेब बेंडे यांनी सांगितले की, भीमाशंकर कारखाना नेहमीच शेतकऱ्यांना जास्तीचा दर देत आला आहे आणि ही परंपरा यापुढेही कायम राहील. त्यांनी २०२५-२६ गाळप हंगामासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

अधिक वाचा: Satbara Apak Shera : सातबाऱ्यावरील अपाक शेरा आता लगेच हटवणार; सुरु झाली 'ही' मोहीम

टॅग्स :साखर कारखानेऊसपुणेदिलीप वळसे पाटीलशेतकरीशेतीदिवाळी 2024बँक