Lokmat Agro >शेतशिवार > कोल्हापूर जिल्ह्यातील हा कारखाना २०१० मधील शेतकऱ्यांची शिल्लक एफआरपी येत्या महिन्याभरात देणार

कोल्हापूर जिल्ह्यातील हा कारखाना २०१० मधील शेतकऱ्यांची शिल्लक एफआरपी येत्या महिन्याभरात देणार

This factory in Kolhapur district will pay the remaining FRP of farmers in 2010 within the next month | कोल्हापूर जिल्ह्यातील हा कारखाना २०१० मधील शेतकऱ्यांची शिल्लक एफआरपी येत्या महिन्याभरात देणार

कोल्हापूर जिल्ह्यातील हा कारखाना २०१० मधील शेतकऱ्यांची शिल्लक एफआरपी येत्या महिन्याभरात देणार

चंदगड तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या दौलत कारखान्याला बोलल्याप्रमाणे केडीसीसीच्या कर्जातून मुक्त केले असून, तासगावकरच्या काळातील २०१० मधील शेतकऱ्यांची शिल्लक एफआरपी येत्या महिन्याभरात देणार आहे.

चंदगड तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या दौलत कारखान्याला बोलल्याप्रमाणे केडीसीसीच्या कर्जातून मुक्त केले असून, तासगावकरच्या काळातील २०१० मधील शेतकऱ्यांची शिल्लक एफआरपी येत्या महिन्याभरात देणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

चंदगड तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या दौलत कारखान्याला बोलल्याप्रमाणे केडीसीसीच्या कर्जातून मुक्त केले असून, तासगावकरच्या काळातील २०१० मधील शेतकऱ्यांची शिल्लक एफआरपी येत्या महिन्याभरात देणार असल्याची माहिती अथर्व-दौलतचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली.

हलकर्णी येथे शुक्रवारी कारखाना कार्यस्थळावर आयोजित रोलर पूजन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी गोपाळराव पाटील, संग्राम कुपेकर, संतोष मळवीकर, संजय पाटील, गोपाळ पाटील, मधुकर सावंत यांसह सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी संजय पाटील व शुभांगी पाटील मान्यवरांच्या हस्ते रोलरपूजन झाले. खोराटे म्हणाले, शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानूनच 'अथर्व-दौलत'चे काम सुरू आहे.

शेतकरी, कामगार व तोडणी-ओढणी वाहतूकदारांच्या सहकार्याने कारखान्याचे गळीत हंगाम यशस्वी होत आहेत. यापुढील काळात टप्प्याटप्प्याने सर्वच देणी देणार आहे. अश्रू लाड यांनी प्रास्ताविक केले. दयानंद देवाण यांनी आभार मानले. 

राखेपासून मिळणार मुक्ती
कारखान्यातील सामग्री जुनी झाली आहे. बॉयलरमधून येणाऱ्या राखेपासून होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी २५० ते ३०० कोटी खर्चातून नवीन बॉयलर उभारणार असून, ते लोकांच्या आरोग्याला लाभदायक ठरणार आहे. यासाठी हलकर्णी ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा: केंद्र सरकारकडून एफआरपीत वाढ; पण याचा शेतकऱ्यांना होणार किती फायदा? जाणून घ्या सविस्तर

Web Title: This factory in Kolhapur district will pay the remaining FRP of farmers in 2010 within the next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.