एप्रिल महिना चालू झाला की उन्हाळ्याची चाहूल लागते. मे तसेच जून महिन्यातील काही काळ हा खूपच तापदायक असतो, म्हणजे हवेचे तापमान वाढलेले असते आणि आपल्याला अस्वस्थ वाटत असते.
सारखी तहान लागणे, गळुन गेल्यासारखे वाटणे, त्वचा कोरडी पडणे, उष्माघात होणे, भूक कमी झाल्यासारखे वाटणे, उन्हामुळे चक्कर आल्यासारखे वाटणे अशी अनेक लक्षणे या काळात दिसतात.
विशेष म्हणजे, काही फळे खाऊन आपल्याला यावर उतारा मिळू शकतो. काही फळांचे गुणधर्म व उपयोग आता आपण पाहूया.
आंबा
◼️ याला फळांचा राजा म्हटलं जातं. आंबा हा सरीसत ऊर्जा निर्माण करून पित्ताचा नाश करणारा आहे व शरीराचे पोषण करणारा आहे.
◼️ आंबा खाण्यापूर्वी साधारण अर्था तास पाण्यात बुडवून ठेवावा व नंतर तो खावा.
◼️ जेवण सुग्रास होण्यासाठी आमरस करूनही आंबा खाता येतो. त्यात थोडी सुंठ व वेलची घातल्यास तो पचायला सोपा होतो.
◼️ कच्चा आंबा म्हणजे कैरी कैरीचे पन्हे करून उन्हाळ्याच्या दिवसांत अवश्य प्यावे. यामुळे तहान भागते व दाह कमी होतो.
◼️ आयुर्वेदात फळे व दूध एकत्र घेऊ नये, असे सांगितले आहे. पण आंबा यास अपवाद आहे.
◼️ हृदयरोग असलेल्यांनी आंबा खावा. त्यामुळे इत्याच्या स्नायूंची दुर्बलता दूर होण्यास मदत होते.
शहाळे/नारळ
◼️ उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी व शरीरातील कमी झालेला जलांश त्वरित भरून काढण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे शहाळ्याचे म्हणजे नारळाचे पाणी.
◼️ हे एक अमृततुल्य पेय आहे. उन्हाळ्यात सर्व लोकांनी ते प्यायला हरकत नाही.
◼️ ज्यांना किडनीचे विकार आहेत, त्यांनी मात्र हे पाणी पिऊ नये किंवा वैद्यकीय सल्ल्यानंतरच त्याचा उपयोग करावा.
ताडगोळा
◼️ ताडगोळा हे उन्हाळ्यात अवश्य खावे असे फळ आहे.
◼️ उन्हात फिरून डोळ्यांची आग किंवा रखरख होत असेल तेव्हा कोवळा ताडगोळा डोळ्यावर ठेवला तर त्वरित आराम मिळतो.
◼️ ताडगोळ्यावर दही किंवा ताक पिऊ नये, तसेच फ्रीजमधील पाणी पिऊ नये.
◼️ केळी व ताडगोळे एकत्र खाऊ नयेत. हृदयरोगी व आमवाताच्या रुग्णांनी ताडगोळे खाऊ नयेत.
◼️ सर्दी, खोकला, छातीत कफ झाला असेल किंवा पचनाची तक्रार असेल तर ताडगोळा न खाणे उत्तम.
करवंदे
◼️ कच्ची करवंदे, हिरवी, टणक व बोराच्या बीच्या आकाराची असतात.
◼️ पिकलेली करवंदे आंबट-गोड लालसर जांभळ्या रंगाची असतात.
◼️ पिकलेली करवंदे चोखून खावीत, मात्र बी खाऊ नये.
◼️ उन्हात फिरल्याने नाकातून रक्त येण्याचा त्रास असलेल्यांनी पिकलेली करवंदे खावीत.
◼️ गांधील माशी किंवा विषारी किडा चावला तर दंश केलेल्या ठिकाणी करवंद कुस्करून लावले तर आग कमी होते.
कलिंगड
◼️ उन्हाळ्यातील त्रास कमी करण्यासाठी निसर्गाने दिलेले कालिंगड हे उत्तम फळ आहे.
◼️ उष्माघात झाल्यास कालिंगडाचा रस (ज्यूस) दिल्यास त्वरित फायदा होतो.
◼️ कलिंगडाच्या रसात थोडा लिंबाचा रस मिसळला व खडीसाखर घालून जेवणापूर्वी घेतल्यास मळमळ कमी होते, भूक लागते व उलटी होण्याची भावना होत असल्यास ती कमी होते.
◼️ कलिंगड रात्री खाऊ नये. कारण, शरीरावर सुज येण्याची शक्यता असते.
◼️ भाताबरोबर खाऊ नये. त्यामुळे अतिसार होऊ शकतो
- डॉ. देविका देशमुख
एम.डी, आयुर्वेद पंचकर्मतज्ज्ञ
अधिक वाचा: शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला अखेर मंजुरी; आता 'या' १३ जिल्ह्यांतून जाणार हायवे
Web Summary : Beat the summer heat with mangoes, coconut water, palmyra fruit, karvandha berries, and watermelon. These fruits offer hydration, energy, and relief from heat-related ailments. Consume wisely for optimal health benefits.
Web Summary : आम, नारियल पानी, ताड़गोला, करोंदा और तरबूज से गर्मी को मात दें। ये फल जलयोजन, ऊर्जा और गर्मी से संबंधित बीमारियों से राहत देते हैं। बेहतर स्वास्थ्य के लिए इनका सेवन समझदारी से करें।