Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील 'या' ३८ साखर कारखान्यांनी मागील वर्षीच्या साखर हंगामात थकवली १४० कोटी एफआरपी

राज्यातील 'या' ३८ साखर कारखान्यांनी मागील वर्षीच्या साखर हंगामात थकवली १४० कोटी एफआरपी

These 38 sugar factories in the state spent 140 crore FRP in last year's sugar season | राज्यातील 'या' ३८ साखर कारखान्यांनी मागील वर्षीच्या साखर हंगामात थकवली १४० कोटी एफआरपी

राज्यातील 'या' ३८ साखर कारखान्यांनी मागील वर्षीच्या साखर हंगामात थकवली १४० कोटी एफआरपी

sugarcane frp मागील वर्षीच्या साखर हंगामात ऊस घेऊन आलेल्या राज्यातील ३८ साखर कारखान्यांनी अद्यापही १४० कोटी रुपये थकविले आहेत.

sugarcane frp मागील वर्षीच्या साखर हंगामात ऊस घेऊन आलेल्या राज्यातील ३८ साखर कारखान्यांनी अद्यापही १४० कोटी रुपये थकविले आहेत.

सोलापूरः मागील वर्षीच्या साखर हंगामात ऊस घेऊन आलेल्या राज्यातील ३८ साखर कारखान्यांनी अद्यापही १४० कोटी रुपये थकविले आहेत. यंदाचा साखर हंगाम सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी झाला आहे.

मागील वर्षीच्या गाळप हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. उसाच्या कमतरतेमुळे तसे साखर कारखाने फारच कमी दिवस चालले होते. संपूर्ण हंगामातील गाळप ८५५. १० लाख मे. टन ऊस गाळप झाले होते.

मागील वर्षभरात १६२ साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे व त्यापेक्षा प्रति टन अधिक रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे. मात्र राज्यातील विविध जिल्ह्यातील ३८ साखर कारखान्यांनी १४० कोटी रुपये ऊस उत्पादकांचे दिले नाहीत.

मागील गाळपातील आकडे
◼️ मागील वर्षी गाळप घेतलेले कारखाने : २००
◼️ झालेले एकूण गाळप : ८५५. १० लाख मे. टन
◼️ एफआरपी देय रक्कम : ३१,५९८ कोटी
◼️ एफआरपी दिलेली रक्कम : ३१, ४५८ कोटी
◼️ एफआरपी देणे शिल्लक : १४० कोटी
◼️ आर.आर.सी. कारवाई : २८ कारखाने

राज्यात १४७ साखर कारखाने सुरू
◼️ राज्यातील साखर हंगाम आता वेग घेऊ लागला असून १४७ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे.
◼️ आतापर्यंत ११७ लाख मे. टन ऊस गाळप तर ८७ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.
◼️ यंदा दोनशेहून अधिक साखर कारखाने सुरू होण्याचा अंदाज असला तरी मागील वर्षांची थकलेली एफआरपी, अपुरी ऊस तोडणी-वाहतुक यंत्रणा व अर्थकारणामुळे साखर कारखाने सुरू होण्यास उशिर होत आहे.

शेतकऱ्यांचे पैसे थकविलेले कारखाने
आजरा शेतकरी सहकारी, आजरा
श्री. छत्रपती राजाराम सहकारी
कुंभी-कासारी
पद्मश्री. डॉ. डी. वाय. पाटील
दालमिया भारत शुगर
इको केन एनर्जी
ओलम ग्लोबल अ‍ॅग्रो
आप्पासाहेब नलवडे, गडहिंग्लज
पद्मभूषण क्रांतिवीर, नागनाथ नाईकवाडी
राजारामबापू पाटील, साकराळे वाळवा
राजाराम बापू, वाटेगाव
राजाराम बापू पाटील, करंडवाडी
दालमिया भारत शुगर, कोकरुड
श्रीनाथ म्हकोबा
श्री. साईप्रिय शुगर
अजिंक्यतारा सहकारी
लोकनेते बाळासाहेब देसाई
श्री. सिद्धेश्वर कुमठे
गोकुळ शुगर
मातोश्री लक्ष्मी शुगर
श्री. वृद्धेश्वर सहकारी
कादवा सहकारी, दिंडोरी
श्रद्धा एनर्जी, परतुर
डॉ. व्ही. व्ही. पाटील, केज
कपेश्वर शुगर, औंढा नागनाथ
पूर्णा सहकारी, हिंगोली
श्री. लक्ष्मी नृसिंह शुगर
श्री. रेणुका शुगर, परभणी
बळीराजा शुगर, पुर्णा
योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज, पाथरी
जागृती शुगर, लातूर
सिद्धी शुगर, अहमदपूर
विलास सहकारी, उदगीर
शिवाजी सव्हिस टेशन, नांदेड
टॉन्टी वन शुगर, लोहा
कुंदुरकर शुगर, नायगाव
भाऊराव चव्हाण, नांदेड
नॅचरल ग्रोवर्स, लाखंदूर

अधिक वाचा: Ghonas Snake : विषारी घोणस, फुरसे ह्या सापांचा थंडीतच का वाढतो धोका? जाणून घ्या सविस्तर

Web Title : महाराष्ट्र की 38 चीनी मिलों पर किसानों का ₹140 करोड़ बकाया।

Web Summary : महाराष्ट्र में 38 चीनी मिलों पर पिछले सीजन से किसानों का ₹140 करोड़ बकाया है। 200 मिलों द्वारा 855.10 लाख मीट्रिक टन पेराई के बावजूद, इन मिलों ने उचित और लाभकारी मूल्य (एफआरपी) का भुगतान नहीं किया है। इस सीजन में 147 मिलों ने पेराई शुरू कर दी है, जिससे 87 लाख क्विंटल चीनी का उत्पादन हुआ है।

Web Title : 38 Maharashtra sugar factories owe ₹140 crore to farmers.

Web Summary : 38 sugar factories in Maharashtra owe farmers ₹140 crore from last season. Despite 200 factories crushing 855.10 lakh MT, these factories haven't paid Fair and Remunerative Price (FRP). 147 factories have started crushing this season, producing 87 lakh quintals of sugar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.