आदर्शगाव योजना लोकसहभागातून ग्राम विकास या संकल्पनेवर आधारित आहे. गावांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजना या गावांमध्ये राबविण्यात येतात.
यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या १२ निरनिराळ्या विभागांच्या एकुण ५९ योजनांचा समावेश आहे. त्यापैकी पाणलोट क्षेत्र विकासाचे काम हे गाभा क्षेत्र म्हणून आणि इतर विभागाचे काम हे बिगर गाभा क्षेत्र म्हणून वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
शासन निर्णयानुसार आदर्शगाव योजनेच्या नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून, योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठीत करण्यात आलेली आहे.
आदर्शगाव योजनेंतर्गत राज्यस्तरीय कार्यकारी समितीने ११७ गावांच्या आराखड्यास अंतिम मान्यता प्रदान केलेली असून, त्यापैकी एकूण ११७ गावांस शासन निर्णयान्वये शासन मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
आदर्शगाव योजनेंतर्गत नवीन १७ गावांचा समावेश करणेबाबत राज्यस्तरीय कार्यकारी समितीने मान्यता दिलेली असून, त्यास शासन मान्यता मिळणेबाबत कृषि उपसंचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे पत्रान्वये शासनास विनंती केली होती.
त्यानुसार शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. आदर्शगाव योजनेंतर्गत १७ नवीन गावे समाविष्ट करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. या १७ गावांचा तपशील खालीलप्रमाणे
अ.क्र. | जिल्हा | तालुका | गाव/गावे |
---|---|---|---|
1 | परभणी | मानवत | सावळी, ताकतोंडा |
2 | परभणी | सेनगाव | सुर्याचीवाडी |
3 | सातारा | खटाव | मांदाटणे |
4 | रायगड | म्हसळा | रामपुर, शिरोली |
5 | यवतमाळ | घाटंजी | नांदेपेरा |
6 | यवतमाळ | वणी | वोरी (इजार) |
7 | यवतमाळ | महागाव | दारव्हा, पांढूर्णा |
8 | यवतमाळ | आर्णी | कवठाबाजार |
9 | यवतमाळ | यवतमाळ | मारेगाव, वेगाव |
10 | वर्धा | हिंगणघाट | मुरपाड, मानोरा |
11 | चंद्रपूर | वरोरा | बारव्हा, आर्वी |
12 | नागपूर | उमरेड | मोहपा |
13 | अमरावती | चिखलदरा | बारूगव्हान, बुटिदा |
14 | अमरावती | चिखलदरा | मेहरीआम, कमीदा |
15 | बुलढाणा | देऊळगावराजा | मेढगाव, खडका |
16 | बुलढाणा | देऊळगावराजा | दगडवाडी, मेहुणा राजा |
अधिक वाचा: गेली वर्षभर बाजारातील साखरेचे दर स्थिर; यंदा उसाला पहिली उचल प्रतिटन ३४०० शक्य