Join us

जमीन खरेदी-विक्रीसाठी करण्यात येणाऱ्या दस्त नोंदणीचे काम तीन दिवस बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 10:05 IST

दस्तनोंदणी होऊ शकणार नाही, अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी दिली आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या आय सरिता या सर्व्हरच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

खरेदी-विक्रीसाठी करण्यात येणाऱ्या दस्त नोंदणीचे सर्व्हर गुरुवारी (दि.१४) मध्यरात्रीपासून रविवारी (दि.१७) मध्यरात्रीपर्यंत तीन दिवस बंद राहणार आहे.

दस्तनोंदणी होऊ शकणार नाही, अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी दिली आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या आय सरिता या सर्व्हरच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणीसह अन्य सेवा ही बंद राहतील, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारी स्वातंत्र्यदिन असल्याने सार्वजनिक सुटी आहे.

सर्व्हरच्या देखभाल दुरुस्तीचे काम होणार आहे. सर्व्हर ३ दिवस बंद राहणार आहे याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी केले आहे.

अधिक वाचा: केंद्राच्या सूचनांनुसार शेतकऱ्यांना एफआरपी दर अदा करण्याचा निर्णय लवकरच

टॅग्स :महसूल विभागमहाराष्ट्रऑनलाइनकुलसचिवपुणे