Lokmat Agro >शेतशिवार > पिकांच्या राखणीसाठी गोफण नव्हे तर आता एअरगनचा वापर वाढला; शेतशिवारात फटाक्यांचा आवाज

पिकांच्या राखणीसाठी गोफण नव्हे तर आता एअरगनचा वापर वाढला; शेतशिवारात फटाक्यांचा आवाज

The use of airguns not gofan for protecting crops has increased; the sound of firecrackers on the farm edges | पिकांच्या राखणीसाठी गोफण नव्हे तर आता एअरगनचा वापर वाढला; शेतशिवारात फटाक्यांचा आवाज

पिकांच्या राखणीसाठी गोफण नव्हे तर आता एअरगनचा वापर वाढला; शेतशिवारात फटाक्यांचा आवाज

शेतामध्ये ज्वारीची काढणी आणि गव्हाची कापणी करताना लोक पाहायला मिळत आहेत. मात्र पूर्वीप्रमाणे भलरी या गीताचे स्वर कानी पडत नाहीत. तसेच राखणीसाठी फटाक्यांचा अथवा एअरगनचा वापर केला जात आहे.

शेतामध्ये ज्वारीची काढणी आणि गव्हाची कापणी करताना लोक पाहायला मिळत आहेत. मात्र पूर्वीप्रमाणे भलरी या गीताचे स्वर कानी पडत नाहीत. तसेच राखणीसाठी फटाक्यांचा अथवा एअरगनचा वापर केला जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जयेश निरफळ 

सध्या ज्वारी आणि गव्हाची सुगी सुरू आहे. सकाळी आणि संध्याकाळी शेतामध्ये ज्वारीची काढणी आणि गव्हाची कापणी करताना लोक पाहायला मिळत आहेत. अतिशय शांततेत त्यांचं हे काम सुरू आहे.

मात्र पूर्वीप्रमाणे भलरी या गीताचे स्वर कानी पडत नाहीत. तसेच राखणीसाठी फटाक्यांचा अथवा एअरगनचा वापर केला जात आहे. त्यामुळे सुगीतून भलरी आणि राखणीतून गोपणगुंडा हद्दपार झाल्याचे चित्र आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. पीक काढणीच्या हंगामाला सुगी, असे म्हणतात. सुगीमध्ये लोकांना भरपूर श्रम करावे लागतात.

या श्रमातून आनंद निर्माण करता यावा म्हणून पूर्वीचे लोक भलरी हे गीत गात होते. सकाळी, पहाटे किंवा दुपारनंतर शेताशेतातून भलरी गीताचे स्वर कानी पडत होते आणि लांबून येणाऱ्या जाणाऱ्यांना शेतकरी या ठिकाणी सुगीचे काम करीत आहेत, याचा अंदाज येत असे.

काळ बदलला आणि सर्व काही आधुनिक होऊ लागले. आता सकाळी लवकर ज्वारीची काढणी सुरू होत आहे. मात्र, राजकारण आणि इतर गप्पांचा त्यामध्ये भरणा जास्त आहे.

मचाण विस्मृतीत; अन्य वस्तूंचा वापर

• गोफण चालविण्यासाठी शेतामध्ये चार खांबांवर एक तात्पुरते छत तयार केले जाई. याला मचाण असे बोलले जात होते.

• यावर उभे राहून गोपणीतून दगड शेतामध्ये भिरकवले जात असत. मचाणावरून दगड फेकल्यावर तो दूरवर जात असल्याने पूर्वी शेताशेतात मचाण बांधलेले दिसे.

• आता मात्र फटाके आणि एअरगन यांचा मोठा आवाज असल्याने मचाण कोणीही बांधत नाही. मचाण पूर्णपणे विस्मृतीत गेले आहे.

हेही वाचा : खिशाला पेन तर हातात घमेले; गावखेड्यातील शिक्षित युवक मजुरी करून करताहेत उदरनिर्वाह

Web Title: The use of airguns not gofan for protecting crops has increased; the sound of firecrackers on the farm edges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.