Lokmat Agro >शेतशिवार > रेशीम विभाग आपल्या दारी मोहिमेतून शेतकऱ्यांना मिळणार पुन्हा संधी; आता नव्याने सुरू करा 'रेशीम शेती'

रेशीम विभाग आपल्या दारी मोहिमेतून शेतकऱ्यांना मिळणार पुन्हा संधी; आता नव्याने सुरू करा 'रेशीम शेती'

The Silk Department will give farmers another opportunity through its door-to-door campaign; Now start 'sericulture' anew | रेशीम विभाग आपल्या दारी मोहिमेतून शेतकऱ्यांना मिळणार पुन्हा संधी; आता नव्याने सुरू करा 'रेशीम शेती'

रेशीम विभाग आपल्या दारी मोहिमेतून शेतकऱ्यांना मिळणार पुन्हा संधी; आता नव्याने सुरू करा 'रेशीम शेती'

रेशीम कार्यालयाकडून 'रेशीम विभाग आपल्या दारी' मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी रेशीम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे रु. ५०० प्रतिएकर याप्रमाणे नोंदणी केली होती, परंतु काही कारणाने तुती लागवड केली नाही आणि रेशीम उद्योग सुरू केला नाही, अशा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन रेशीम योजनेचे माहितीपत्रक व रेशीम उद्योग सुरू करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.

रेशीम कार्यालयाकडून 'रेशीम विभाग आपल्या दारी' मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी रेशीम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे रु. ५०० प्रतिएकर याप्रमाणे नोंदणी केली होती, परंतु काही कारणाने तुती लागवड केली नाही आणि रेशीम उद्योग सुरू केला नाही, अशा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन रेशीम योजनेचे माहितीपत्रक व रेशीम उद्योग सुरू करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अकोला जिल्हा रेशीम कार्यालयाकडून 'रेशीम विभाग आपल्या दारी' मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी रेशीम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे रु. ५०० प्रतिएकर याप्रमाणे नोंदणी केली होती, परंतु काही कारणाने तुती लागवड केली नाही आणि रेशीम उद्योग सुरू केला नाही, अशा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन रेशीम योजनेचे माहितीपत्रक व रेशीम उद्योग सुरू करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.

तसेच त्यांनी तुती लागवड का केली नाही, याबाबत अभिप्रायही घेण्यात येणार आहे. हे अभियान १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्हा रेशीम कार्यालय अकोलामार्फत रेशीम विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येत आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्यात येते. एका गावातून कमीतकमी ५ शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीने जिल्हा रेशीम कार्यालयाकडे ग्राम रोजगार सेवकांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज करावेत. यासाठी प्रतिएकर रु. ५०० नोंदणी शुल्क रेशीम कार्यालयात जमा करावे.

मनरेगा अंतर्गत, एका एकर वृक्ष लागवड जोपासना यासाठी तीन वर्षात रु. २ लाख १२ हजार ७८४ मजुरी दिली जाणार आहे. रेशीम कीटक संगोपनगृह बांधकामासाठी मजुरी म्हणून रु. ६६ हजार ४५६, तर साहित्यासाठी रु. १ लाख ५३ हजार रुपये देण्यात येणार आहे. अशाप्रकारे एकूण रु. ४ लाख ३२ हजार २४० रुपये तीन वर्षांत दिले जाणार आहेत.

बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र २ योजनेत सहभाग घेता येईल. तुती वृक्षलागवडीसाठी १ एकरकरिता ४५ हजार रुपये, सिंचन व्यवस्थेसाठी ४५ हजार, संगोपनगृह बांधकामासाठी रु. २ लाख ४३ हजार ७५०, संगोपन साहित्यासाठी ३७ हजार ५०० आणि निर्जंतुकीकरण औषधीसाठी ३ हजार ७५० रुपये काम पूर्ण झाल्यानंतर दिले जातात.

या योजनेतून तुती वृक्षलागवड

• महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी या पावसाळ्यात तुतीच्या १० कोटी वृक्षांची लागवड करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. याद्वारे तुती वृक्षलागवडीची गणना करण्यात येणार आहे. रेशीम संचालनालयाला ४ कोटींचा लक्ष्यांक देण्यात आला असून, त्यापैकी १८ लाख (३०० एकर) तुती वृक्षलागवडीचे उद्दिष्ट वाशिम जिल्ह्यास देण्यात आले आहे.

• शिवाय, शेतकरीबंधूंनी पर्यावरणपूरक आणि शेतीशी निगडित रेशीम उद्योग सुरू करून रेशीम कोषनिर्मितीसह आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालय प्लॉट क्र. ८, ९, १०, एम. आय. डी. सी. फेज-१, शिवर, शक्त्ती टायर्स शेजारी अकोला यांच्याकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र

Web Title: The Silk Department will give farmers another opportunity through its door-to-door campaign; Now start 'sericulture' anew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.