बारामती : तहसील कार्यालयामार्फत २६ डिसेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या काळात 'जिवंत सातबारा मोहीम टप्पा २'चे आयोजन करण्यात येणार आहे.
या मोहिमेचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.
कोणत्या दुरुस्त्या करता येणार?
◼️ या मोहिमेअंतर्गत ७/१२ अद्ययावत करणे.
◼️ यामध्ये एकूण नोंद कमी करणे.
◼️ इतर हक्कातील महिला वारस नोंदी कब्जेदार सदर करणे.
◼️ सातबाऱ्यावरील इतर अनावश्यक कालबाह्य नोंदी कमी करणे.
◼️ रहिवासी विभागातील तुकडेबंदीचे व्यवहार विनामूल्य नियमित करणे.
◼️ लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्नीचे नाव सातबाऱ्यावर नोंद करणे.
ही सर्व कामे विनामूल्य केली जाणार आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारच्या शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही. नागरिकांनी अर्जासोबत संबंधित सातबारा आणि फेरफार संलग्न केल्यास नोंदी जोडव्यात.
यासाठी संबंधित महसूल मंडळातील मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज व संबंधित कागदपत्रे जमा केल्यास २६ जानेवारीपूर्वी नोंदी नियमितीकरण केले जाणार आहे. तसेच, विविध शासकीय योजनांचा लाभ मोहीम स्वरूपात देण्याचे नियोजन केले आहे.
अधिक वाचा: घरबसल्या मिळवा आता दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज; केंद्र सरकारने सुरु केले 'हे' नवे पोर्टल
