Join us

साखर कारखान्यांचा हंगाम सुरू पण किती मिळणार पहिली उचल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 10:33 IST

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असून, येत्या दोन दिवसांत गती घेणार आहे. हंगाम सुरू झाला, तरी ऊस दराचे काय? असा प्रश्न असला, तरी एफआरपी एक रकमी देण्याची तयारी बहुतांशी साखर कारखान्यांची आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असून, येत्या दोन दिवसांत गती घेणार आहे. हंगाम सुरू झाला, तरी ऊस दराचे काय? असा प्रश्न असला, तरी एफआरपी एक रकमी देण्याची तयारी बहुतांशी साखर कारखान्यांची आहे.

जिल्ह्यातील सरासरी साखर उतारा पाहिला, तर प्रतिटन ३२०० रुपये उचल मिळू शकते. ज्यांचा उतारा कमी आहे, त्यांची किमान तीन हजार उचल राहू शकते. स्वाभिमानीने ऊस परिषदेत प्रतिटन ३४०० रुपयांची मागणी केली असून, त्यांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातील 'आजरा', 'वारणा', 'दालमिया', 'डी. वाय. पाटील', 'शाहू', 'कुंभी', 'ओलम अॅग्री' या कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. उर्वरित कारखाने दोन दिवसांत सुरू होणार आहेत.

हंगाम सुरू झाला असला, तरी उसाला दर किती मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा १२.५० टक्के राहिला आहे. या उताऱ्यानुसार प्रतिटन ३२०० रुपयांपर्यंत दर मिळू शकतो.

उसाचा तुटवडा, कारखान्यातील स्पर्धा आणि साखरेला प्रतिक्विंटल मिळत असलेला ३४०० रुपये दर पाहता एकरकमी एफआरपी देण्यात कारखान्यांना फारशी अडचण येणार नाही.

एफआरपीनुसार विचार केला, तर प्रतिटन तीन हजार रुपयांच्या पुढेच पहिली उचल मिळू शकते. दरम्यान, स्वाभिमानीने ऊस परिषदेत दराची मागणी केली आहे. अद्याप कारखान्यांनी पहिल्या उचलीबद्दल काहीच सांगितलेले नाही.

निकालानंतर 'स्वाभिमानी' आक्रमक होण्याची शक्यता आहे. पहिली उचल आणि त्यावर किती देणार? हे जाहीर करूनच हंगाम सुरू करा, असा प्रयत्न 'स्वाभिमानी'चा असू शकतो.

अधिक वाचा: Us Galap Hangam : कसा ठरतो ऊस तोडणी व वाहतूक खर्च वाचा सविस्तर

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीकोल्हापूरशेतीस्वाभिमानी शेतकरी संघटना