रायगड जिल्हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून परिचित होता. आता या कोठाराला ग्रहण लागले असून गेल्या आठ-दहा वर्षात एक लाख हेक्टरवरून हे क्षेत्र ८५ हजार हेक्टर पेक्षा कमी झाले आहे. कृषी विभागाने यंदा ८३ हजार ८९० हेक्टर क्षेत्रावर भात आणि नाचणी पिकांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
यासाठी तयारीही केली आहे. या पार्श्वभूमीवर लागवड क्षेत्रात होत असलेली घट कमी होऊ लागले आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यात ९५ हजार ६४५ एवढे भात लागवडीचे क्षेत्र असले तरी गतवर्षी ७८ हजार ७०० हेक्टरवर भाताची पेरणी केली होती. कृषी विभागाने यंदा ८१ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.
तसेच गतवर्षी प्रती हेक्टरी उत्पादकता २ हजार ३४८ किलोग्रॅम होती. यावर्षी ती २ हजार ९९५ करण्याचा मानस कृषी विभागाने केला आहे. यंदा ८३ हजार ८९० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचा मानस आहे. यासाठी खते, बियाणे, कीटकनाशकांची तरतूद केली आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून विविध पिके घेतली जाणार आहेत. लागवड क्षेत्र वाढीचे प्रयत्न आहेत, असे कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी सांगितले.
नावीन्यपूर्ण पिकांच्या लागवडीचे प्रयोग होणार
नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यात हळद, लाल आणि काळ्या रंगाचा भात, कणघर, ड्रॅगन फ्रूट, करटोली, काळी मिरी आणि मोगरा या पिकांची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा तालुक्यात ही लागवड केली जाणार आहे.
नाचणी पीक उत्तम, पण...
जिल्ह्यात २ हजार ८११ हेक्टर नाचणी लागवडी खालील क्षेत्र आहे. यापैकी गेल्या वर्षी २ हजार ४९१ हेक्टरवर नाचणीची लागवड करण्यात आली होती. भात, नाचणी क्षेत्र हळूहळू कमी होऊ लागले आहे. ते क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वाढते औद्योगिककरण, महामार्ग, रस्ते यांचे जाळे जिल्ह्यात विणले जात आहे. यामध्ये पिकती भात शेत जमीन विकली जात आहे. त्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे.
हेही वाचा : फवारणीपूर्वी तपासा पाण्याचा सामू; पीएच बरोबर नसेल तर महागडी फवारणी सुद्धा जाईल फेल