Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल अखेर सहा महिन्यांनी जाहीर; पुढील प्रक्रिया कशी असणार?

कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल अखेर सहा महिन्यांनी जाहीर; पुढील प्रक्रिया कशी असणार?

The results of the Agricultural Services Mains Examination will finally be announced after six months; What will be the next process? | कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल अखेर सहा महिन्यांनी जाहीर; पुढील प्रक्रिया कशी असणार?

कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल अखेर सहा महिन्यांनी जाहीर; पुढील प्रक्रिया कशी असणार?

mpsc krushi seva mulakhat महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला आहे. यात एकूण ८२७ उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले आहेत.

mpsc krushi seva mulakhat महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला आहे. यात एकूण ८२७ उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले आहेत.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला आहे. यात एकूण ८२७ उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले आहेत.

त्यातील ५२० उमेदवार पुण्यातील आहेत. प्रशासकीय कारणास्तव तीन उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा सविस्तर मुलाखत कार्यक्रम www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२४ रोजी कृषी सेवा संवर्गातील २५८ पदांचा समावेश करण्यात आला.

त्यामुळे एकूण ८२८ पदांसाठी १ डिसेंबर २०२४ रोजी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. एमपीएससीने १८ मे रोजी कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ घेतली होती.

...तर रद्द होईल उमेदवारी
मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखतीस बोलावण्यात येत आहे. मात्र, उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा अर्जातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येणार आहे.

विभागनिहाय पात्र उमेदवार
अमरावती - ४६
छत्रपती संभाजीनगर - १०३
नागपूर - ४३
नाशिक - ९७
नवी मुंबई - १८
पुणे - ५२०

अशी असणार प्रक्रिया
◼️ मुख्य परीक्षांच्या निकालानंतर मुलाखती पूर्ण होऊन तात्पुरत्या निवड याद्या प्रसिद्ध झाल्या.
◼️ कृषी सेवेचे मात्र निकालच रखडले होते.
◼️ अखेर एमपीएससीने मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
◼️ दरम्यान, पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करायची आहे त्यांनी गुणपत्रक प्रोफाइलमध्ये मिळाल्यापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

अधिक वाचा: जिवंत सातबारा मोहीमेचा दुसरा टप्पा सुरु; आता सातबाऱ्यावर करता येतील 'ह्या' दुरुस्त्या

Web Title : कृषि सेवा मुख्य परीक्षा परिणाम छह महीने बाद घोषित; अगली प्रक्रिया

Web Summary : एमपीएससी ने कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ के परिणाम घोषित किए, ८२७ उम्मीदवार साक्षात्कार के लिए उत्तीर्ण हुए। पुणे से ५२० उम्मीदवार सफल रहे। साक्षात्कार कार्यक्रम www.mpsc.gov.in पर प्रकाशित किया जाएगा। दस्तावेज़ सत्यापन महत्वपूर्ण है; विसंगतियाँ अयोग्यता का कारण बन सकती हैं। मार्कशीट मिलने के १० दिनों के भीतर पुनर्मूल्यांकन अनुरोध स्वीकार किए जाते हैं।

Web Title : MPSC Announces Agriculture Services Main Exam Results After Six Months Delay

Web Summary : MPSC declared the Agriculture Services Main Exam 2024 results, qualifying 827 candidates for interviews. Pune has 520 successful candidates. Interview schedules will be published on www.mpsc.gov.in. Document verification is crucial; discrepancies lead to disqualification. Re-evaluation requests are accepted within 10 days of receiving mark sheets.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.