पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात खरीप २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ करीता पीक विमा योजना राबविली जाते.
अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन उत्पादनावर आधारीत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
रब्बी हंगाम २०२५-२६ गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायल), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमुग व रब्बी कांदा (६ पिके) या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.
सदर योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत पुढीलप्रमाणे आहे.◼️ रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) करिता दिनांक ३० नोव्हेंबर, २०२५.◼️ गहु (बागायत), हरभरा, रब्बी कांदा या पिकाकरिता दिनांक १५ डिसेंबर, २०२५.◼️ उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग या पिकाकरिता दिनांक ३१ मार्च, २०२६ अशी आहे.
त्यासाठीचे PMFBY पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरुन देणे आवश्यक आहे.
जर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर तसे त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.
जे शेतकरी स्वतःच्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.
यासाठी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टलवर स्वतःही शेतकरी नोंदणी करू शकतात.
अथवा बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इंन्शुरन्स अॅप व सामुहिक सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी तात्काळ आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी/जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी यांचेशी संपर्क साधावा.
योजना कार्यान्वयीन यंत्रणा
| अ. क्र. | समूह क्र. | समाविष्ट जिल्हे | नियुक्त विमा कंपनी | संपर्क तपशील |
|---|---|---|---|---|
| 1 | 1 | अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर | भारतीय कृषि विमा कंपनी (AIC of India) | मुंबई क्षेत्रिय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ईमेल: pikvima@aicofindia.com |
| 2 | 2 | सोलापूर, जळगाव, सातारा | भारतीय कृषि विमा कंपनी (AIC of India) | मुंबई क्षेत्रिय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ईमेल: pikvima@aicofindia.com |
| 3 | 3 | परभणी, वर्धा, नागपूर | भारतीय कृषि विमा कंपनी (AIC of India) | मुंबई क्षेत्रिय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ईमेल: pikvima@aicofindia.com |
| 4 | 4 | जालना, गोंदिया, कोल्हापूर | भारतीय कृषि विमा कंपनी (AIC of India) | मुंबई क्षेत्रिय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ईमेल: pikvima@aicofindia.com |
| 5 | 5 | नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग | भारतीय कृषि विमा कंपनी (AIC of India) | मुंबई क्षेत्रिय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ईमेल: pikvima@aicofindia.com |
| 6 | 6 | छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड | भारतीय कृषि विमा कंपनी (AIC of India) | मुंबई क्षेत्रिय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ईमेल: pikvima@aicofindia.com |
| 7 | 7 | वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार | भारतीय कृषि विमा कंपनी (AIC of India) | मुंबई क्षेत्रिय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ईमेल: pikvima@aicofindia.com |
| 8 | 8 | हिंगोली, अकोला, धुळे, पुणे | भारतीय कृषि विमा कंपनी (AIC of India) | मुंबई क्षेत्रिय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ईमेल: pikvima@aicofindia.com |
| 9 | 9 | यवतमाळ, अमरावती, गडचिरोली | भारतीय कृषि विमा कंपनी (AIC of India) | मुंबई क्षेत्रिय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ईमेल: pikvima@aicofindia.com |
| 10 | 10 | धाराशिव | आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड | माणिकचंद आयकॉन, 3 रा मजला, प्लॉट नं. 246, सी विंग, बंडगार्डन, पुणे-411001 ईमेल: ICICILOMPMFBYMH@icicilombard.com |
| 11 | 11 | लातूर | आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड | माणिकचंद आयकॉन, 3 रा मजला, प्लॉट नं. 246, सी विंग, बंडगार्डन, पुणे-411001 ईमेल: ICICILOMPMFBYMH@icicilombard.com |
| 12 | 12 | बीड | आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड | माणिकचंद आयकॉन, 3 रा मजला, प्लॉट नं. 246, सी विंग, बंडगार्डन, पुणे-411001 ईमेल: ICICILOMPMFBYMH@icicilombard.com |
तरी रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक वाचा: E Pik Pahani: राज्यात ई-पीक पाहणीला चौथ्यांदा मुदतवाढ; आता शेतकरी किती तारखेपर्यंत करू शकतात नोंदणी?
Web Summary : Maharashtra starts crop insurance for Rabi 2025-26. Farmers can apply for wheat, sorghum, chickpea, summer paddy, groundnut, and onion. Enrollment is optional, deadlines vary by crop. Apply via PMFBY portal or designated agents.
Web Summary : महाराष्ट्र ने रबी 2025-26 के लिए फसल बीमा शुरू किया। किसान गेहूं, ज्वार, चना, ग्रीष्मकालीन धान, मूंगफली और प्याज के लिए आवेदन कर सकते हैं। नामांकन वैकल्पिक है, समय सीमा फसल के अनुसार अलग-अलग है। PMFBY पोर्टल या नामित एजेंटों के माध्यम से आवेदन करें।