Lokmat Agro >शेतशिवार > कल्पवृक्ष महूचे झाड आदिवासींच्या उपजीविकेसाठी ठरत आहे वरदान

कल्पवृक्ष महूचे झाड आदिवासींच्या उपजीविकेसाठी ठरत आहे वरदान

The Kalpavriksha Mhow tree is proving to be a boon for the livelihood of tribals | कल्पवृक्ष महूचे झाड आदिवासींच्या उपजीविकेसाठी ठरत आहे वरदान

कल्पवृक्ष महूचे झाड आदिवासींच्या उपजीविकेसाठी ठरत आहे वरदान

"कल्पवृक्ष" महू झाड आदिवासी बांधवांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. महू झाडांची फुले गोळा करून त्यापासून विविध पदार्थ तयार करून त्यातून आदिवासी बांधवांना रोजगार मिळत आहे.

"कल्पवृक्ष" महू झाड आदिवासी बांधवांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. महू झाडांची फुले गोळा करून त्यापासून विविध पदार्थ तयार करून त्यातून आदिवासी बांधवांना रोजगार मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

विशाल गांगुर्डे

"कल्पवृक्ष" महू झाड आदिवासी बांधवांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. महू झाडांची फुले गोळा करून त्यापासून विविध पदार्थ तयार करून त्यातून आदिवासी बांधवांना रोजगार मिळत आहे.

कल्पवृक्ष महू झाडाला येणाऱ्या फुलांची पिंपळनेरच्या पश्चिम पट्टयात वेचणी करण्यासाठी भल्या पहाटे गाव पाड्यातील महिला पुरुष दऱ्याखोऱ्यात दिसून येत आहेत.

धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील गावागावात मोहफुलांची अनेक झाडे आहेत. घरासमोर, शेतबांधावर असलेल्या या झाडांच्या फुलांचा सुगंध परिसरात दरवळतो आहे.

मार्च ते जून या कालखंडात येणारी महू फुले त्यानंतर येणारी टोळंबी यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ हे वर्षभर टिकवून ठेवण्यासाठीची तयारीही आदिवासी महिला घरोघरी करत आहेत.

पहाटे गोळा करण्यात आलेली महूची फुले सुकवून ती साठवून ठेवली जातात. यातून काहीअंशी निर्माण झालेली आर्थिक विवंचना दूर करण्याचा प्रयत्न होत आहे.

महू वृक्ष हा डबल उत्पादन देणारे एकमेव वृक्ष असल्याने त्याला "कल्पवृक्ष महू" म्हटले जाते. हा वृक्ष फुले देतो व फलेही देतो. यामुळे महू वृक्ष आदिवासींसाठी वरदान ठरतो.

महू फुले वेचणीची लगबग

• मोहगाव, शेंदवड, चावडीपाडा, पिंपळपाडा, वडपाडा केवडीपाडा, वारिपाडा, मोगरपाडा, मांजरी, वासाँ, सिताडी, काळांबा, धसकल, चोरवड, मळगाव, खरगाव, पारसरी चरणमाळ, नांदरखी, बसरावळ या गावात सध्या जोरदार महू वेचणी सुरू आहे.

• गुल्ली महू, रातगोल महू, इंडाल महू, सिकटयाल महू, सिडी महू, फाटाळ महू आदी सहा महू झाडांच्या प्रजाती सर्वश्रुत आहेत. फुलांचा हंगाम गेल्यानंतर महू झाडाला येणाऱ्या टोळंबीपासून तेल तयार करण्यात येते. हे तेल पिंपळनेरच्या पश्चिम पट्टयात खाद्यतेल म्हणून वापरतात.

विविध आजारांवर मोहफुले गुणकारी

• महू फुलांपासून मदिरा (दारू), भाकरी, लाडू, खीर, भजी, आळ भाजलेले महू, राबडी, महू फुलांचे बाँडे, मोहाच्या चिंचोडे, चकल्या, महू चटणी, मोक्सी, मोहाच्या लाटा, डुकल्या आदी पदार्थ तयार करण्यात येतात.

• एप्रिल महिना सुरू असल्याने तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. उन्हाळ्यात शरीरात रोगप्रतिकारक्षमता वाढत असल्याचे सांगण्यात आले. पहाटे महू फुलांची गळ होते. महू फुले वेचणी करताना आदिवासी बांधव ठिकठिकाणी दिसून येत आहेत.

आदिवासींसाठी रोजगार

• आदिवासी महिला-पुरुष मोहफुले बाजारात विकून पैसे मिळवतात. या फुलांपासून दारूही काढली जाते. त्यातूनही उत्पन्न मिळते.

• फुलांचा हंगाम संपला, की या झाडांना फळे येतात. ही फळे खाण्यासाठी वापरली जातात. त्यातील आठोळीतील गरापासून तेल काढले जाते. हे तेल औषधी असून, आदिवासी त्याचा खाण्यासाठी उपयोग करतात.

• गुरांच्या विविध आजारांवर मोहाच्या फुलातील हा गर औषधी म्हणून वापरला जातो. मोहाच्या या फळाला टोळ म्हणतात. महू फुलांमधून येणाऱ्या उत्पन्नातून उपजीविका भागविण्यास मदत होते आहे.

हेही वाचा : नियमित खा फक्त एक चिकू; आरोग्यवर्धक चिकू दूर करेल विविध विकार

Web Title: The Kalpavriksha Mhow tree is proving to be a boon for the livelihood of tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.