Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाक घरातील हिरवा खजिना आरोग्यासाठी सुद्धा ठरतो फायद्याचा; जाणून घ्या कढीपत्ताचे गुणधर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:57 IST

भाजीला स्वाद आणि सुगंध देणारा कढीपत्ता केवळ पाककृतींचा एक घटक नाही, तर त्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्मही आहेत. आयुर्वेदानुसार, कढीपत्ता शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

भाजीला स्वाद आणि सुगंध देणारा कढीपत्ता केवळ पाककृतींचा एक घटक नाही, तर त्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्मही आहेत. आयुर्वेदानुसार, कढीपत्ता शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

यात जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि एकूण आरोग्य सुधारण्यात मदत करतात. त्यामुळे भाजी, सूप, डाळ किंवा इतर पदार्थांमध्ये कढीपत्ताचा नियमित वापर केवळ स्वाद वाढवत नाही, तर पोषणतत्त्वांची भरपाईही करतो.

कढीपत्त्याचे नियमित सेवन मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, यात असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते.

तसेच, हृदयविकाराच्या जोखमी कमी करण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी देखील कढीपत्ता उपयुक्त आहे. अनेक लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना कढीपत्ता त्यांच्या आहारात समाविष्ट करतात, कारण हे पचन सुधारते आणि शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते.

तसेच, कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या बाबतीतही कढीपत्ता उपयुक्त ठरतो. त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

सततच्या संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की, कढीपत्ता मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यास आणि त्वचेची प्रकृती सुधारण्यासही हातभार लावतो. त्यामुळे रोजच्या आहारात कढीपत्ता समाविष्ट करणे केवळ स्वादासाठीच नव्हे, तर शरीर आणि मनाच्या निरोगीतेसाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरते.

कढीपत्त्यातील खनिज गुणधर्म काय ?

व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई मुबलक प्रमाणात. लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम. अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक. फायबरचे उत्तम स्रोत.

दक्षिण भारतीय पदार्थांत आवर्जून वापर

दक्षिण भारतीय पदार्थात कढीपत्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पदार्थाची चव आणि सुगंध वाढवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते.

कढीपत्त्याचे फायदे काय?

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत, अतिरिक्त चरबी कमी करण्यास उपयुक्त, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास सहाय्यक, पचनक्रिया सुधारते, केस गळती कमी करण्यास मदत, त्वचेचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.

अंगणातच कढीपत्त्याचे झाड

कढीपत्त्याचे झाड घराच्या अंगणात किंवा कुंडीत सहज वाढते. कमी पाण्यातही ते तग धरते. त्यामुळे ताजा आणि शुद्ध कढीपत्ता सहज उपलब्ध होतो. अनेकजण अंगणात कढीपत्त्याचे झाड लावण्याला पसंती देत आहेत.

आयुर्वेदात कढीपत्त्याचे अनेक गुणधर्म आहेत. कढीपत्ता हा केवळ चव वाढवणारा घटक नाही, तर औषधी गुणधर्मानी समृद्ध आहे. दररोज ८ ते १० पाने चावून खाल्ल्यास मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. - डॉ. अलका मकासरे आयुर्वेद तज्ज्ञ, वाशिम.

हेही वाचा : उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण

English
हिंदी सारांश
Web Title : Curry leaves: Flavorful herb with surprising health benefits revealed.

Web Summary : Curry leaves enhance flavor and offer health benefits. Rich in nutrients, they boost immunity, manage diabetes, aid weight loss, and lower cholesterol. Regular use supports heart and brain health.
टॅग्स :भाज्याअन्नशेती क्षेत्रआरोग्यहेल्थ टिप्स